IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)

MS Dhoni NSG Camp Shooting Practice IPL 2026 CSK: एमएस यंदाच्या हंगामात अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:03 IST2026-05-18T18:00:35+5:302026-05-18T18:03:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni suddenly arrives at NSG camp while IPL 2026 is underway practices shooting with commandos (VIDEO) | IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)

IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)

MS Dhoni NSG Camp Shooting Practice IPL 2026 CSK: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. IPL 2026 मध्ये अद्याप एकही सामना न खेळलेल्या धोनीने चेन्नईतील NSG (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) च्या प्रादेशिक केंद्राला भेट दिली. तिथे त्याची एक अनोखी झलक दिसली. धोनीने कमांडोंसोबतही वेळ घालवला. तसेच नेमबाजीचा सरावही केला.

यावेळी धोनीने त्याच्या स्वत:च्या फिटनेसबद्दल एक मजेशीर प्रश्न विचारला, ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले. स्वतःकडे बोट दाखवत धोनी कमांडोंना म्हणाला, "मी फिट दिसतोय, नाही का?" त्यावर सारे कमांडो मनसोक्त हसले. हा क्षण सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसलेल्या एमएस धोनीने एनएसजी कमांडोंसोबत फिटनेस, प्रशिक्षण आणि शूटिंगच्या तंत्रावर चर्चा केली. त्याने वेपन शूटिंगच्या सरावातही भाग घेतला आणि कमांडो अधिकाऱ्यांसोबत बराच वेळ घालवला.


धोनी आणि भारतीय लष्कर यांच्यातील नाते सर्वांनाच माहिती आहे. २०११ मध्ये त्याला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आणि लष्करी सेवांमध्ये भाग घेतला. पण धोनीचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा संपूर्ण क्रिकेट जग एकच प्रश्न विचारत आहे की, धोनी आयपीएलच्या सामन्यात कधी खेळणार? आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना आहे. त्यामुळे वातावरण आधीच भावनिक झाले आहे. त्यात आता धोनी पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरेल की नाही याचीच चर्चा रंगली आहे.

Web Title : आईपीएल 2026 के दौरान धोनी एनएसजी कैंप में, कमांडो के साथ शूटिंग का अभ्यास।

Web Summary : एमएस धोनी ने चेन्नई के एनएसजी केंद्र का दौरा किया, कमांडो के साथ शूटिंग का अभ्यास किया और अपनी फिटनेस पर मजाक किया। उन्होंने आईपीएल अटकलों के बीच अधिकारियों के साथ फिटनेस और शूटिंग तकनीकों पर चर्चा की।

Web Title : Dhoni visits NSG camp during IPL 2026, practices shooting with commandos.

Web Summary : MS Dhoni visited Chennai's NSG center, practiced shooting with commandos, and joked about his fitness. He discussed fitness and shooting techniques with officers amidst IPL speculations.