"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:04 IST2026-05-18T16:03:39+5:302026-05-18T16:04:50+5:30
CM Yogi Adityanath statement on Namaz: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रस्त्यावर होणाऱ्या नमाज पाठणाबद्दल योगींनी भूमिका मांडली आहे.

"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा
नमाज पठण करायचे असेल, तर तुम्ही त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नमाज अदा करा. प्रेमाने सांगून तर ऐकलं नाही, तर मग दुसरा मार्ग अवलंबा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला. सोमवारी ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, "त्या लोकांनी मला सांगितले की, साहेब कसे होईल? आमची संख्या जास्त आहे. आम्ही सांगितले की, शिफ्टमध्ये करा. तुमच्या घरात राहण्यासाठी जागा नाहीये, तर तुम्ही संख्या मर्यादित करा. उगाच संख्या का वाढत आहात. जर तुम्हाला व्यवस्थेसोबत राहायचे असेल, तर नियम आणि कायदे पाळावे लागतील."
कायद्याचेच राज्य असणार
"कायद्याचे राज्य असेल आणि कायद्याच्या राज्यात सर्वांना समान वागणूक मिळेल. नमाज पठण आवश्यक आहे, मग तुम्ही शिफ्टमध्ये नमाज पठण करा. आम्ही ते रोखणार नाही. पण, जर रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही. रस्ते सर्वसामान्य माणसांना चालण्यासाठी आहेत. एका आजारी माणसासाठी, कामगारासाटी, कर्मचाऱ्यासाठी, व्यापाऱ्यासाठी आम्ही रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ देणार नाही", योगी आदित्यनाथ म्हणाले.
"आम्ही सगळ्यांना सांगितले आहे की, असे चालणार नाही.रस्त्यावर अराजकता पसरवू देणार नाही. प्रेमाने सांगून ऐकले तर ठीक आहे. ऐकले नाही, तर दुसरा मार्ग अवलंबू. आमचे काम संवाद करणे आहे. पण, संवादाने तुम्ही ऐकणार नसाल, तर संघर्षही होईल. बरेलीमध्ये लोकांनी वापरले आहेत. ताकद दाखवली आहे", असेही आदित्यनाथ म्हणाले.