प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:48 IST2026-05-18T14:39:33+5:302026-05-18T14:48:27+5:30
वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांची तब्येत बिघडल्याने त्यांची तीर्थयात्रा आणि खाजगी दर्शने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. आश्रमाने सांगितले की, महाराजजींना किडनीचा त्रास आहे. हजारो भक्त दर्शन न घेताच परतले आहेत.

प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
वृंदावनचे प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. यामुळे त्यांची पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांचे खाजगी दर्शनही बंद करण्यात आले आहे, त्यामुळे देशभरातील हजारो भक्त निराश झाले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी रविवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने भक्त वृंदावनमध्ये दाखल झाले होते, पण प्रेमानंद महाराज नेहमीप्रमाणे पहाटे ३ वाजता पदयात्रेला निघाले नाहीत. त्यांच्या जागी आश्रमातील शिष्य आले आणि त्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे भक्तांना ही माहिती दिली.
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
शिष्यांनी सांगितले की, महाराजजींची प्रकृती ठीक नसल्याने आजपासूनची पदयात्रा स्थगित करण्यात येत आहे. भक्तांना रस्त्याच्या कडेला गर्दी टाळण्याचे आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही करण्यात आले. या घोषणेनंतर भक्तांना दर्शन न घेताच परतावे लागले. केली कुंज आश्रमानुसार, संत प्रेमानंद महाराज गेल्या २१ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. तब्येत अचानक बिघडल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांती दिली जात आहे.
पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित
पण, पदयात्रा आणि दर्शन पुन्हा कधी सुरू होईल, हे आश्रमाने जाहीर केलेले नाही. महाराजजींच्या अनुपस्थितीनंतर भक्त भावूक झालेले दिसले. प्रेमानंद महाराज दररोज सकाळी केली कुंज आश्रमापासून सौभरी वनापर्यंत सुमारे दीड किलोमीटर चालतात. त्यांच्या पदयात्रेत सामील होण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भक्त येतात.
प्रेमानंद महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील नरवाल तहसील येथील आखरी गावात झाला. त्यांचे वडील शंभू नारायण पांडे आणि आई रमा देवी. प्रेमानंद हे तीन भावांचे मधले अपत्य. ते लहानपणापासून आध्यात्मिक होते आणि त्यांनी आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले. त्यांना गुरु गौरी शरणजी महाराज यांच्याकडून दीक्षा मिळाली.