जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:37 IST2026-05-18T15:33:02+5:302026-05-18T15:37:37+5:30

असाच एक थरारक प्रसंग आहे १९८२ मध्ये आलेल्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा. या प्रसंगावेळी केवळ चित्रपटच सुपरहिट झाला नाही, तर त्या कलाकाराचाही एक प्रकारचा दरारा निर्माण केला.

ashanti movi amris puri When the snake bit the villain's tongue! Silence spread on the shooting set in an instant This was the thrill that happened | जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 

जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मिती अधिकच सोपी झाली आहे. कारण ज्या दृश्यांसाठी मोठा धोका असू शकतो, जे जे प्रत्यक्षात करणे अशक्य असते, असे दृष्य आज व्हीएफएक्स (VFX) अथवा सीजीआय (CGI) च्या मदतीने सहज साकारले जाऊ शकते. मात्र, काही वर्षांपूर्वीच असे जीवघेणे स्टंट कलाकारांना स्वतःच करावे लागत असत. असाच एक थरारक प्रसंग आहे १९८२ मध्ये आलेल्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा. या प्रसंगावेळी केवळ चित्रपटच सुपरहिट झाला नाही, तर त्या कलाकाराचाही एक प्रकारचा दरारा निर्माण केला.

असा घडला होता थरार -
हा किस्सा आहे मिथुन चक्रवर्ती, राजेश खन्ना, झीनत अमान आणि परवीन बाबी यांची भूमिका असलेल्या 'अशांती' चित्रपटातील. या चित्रपटातील खलनायकाचा हा एक सीन आजही लोकांच्या अंगावर शहारा आणतो. या सीनमध्ये, खलनायकाला एक जिवंत साप उचलून आपल्या तोंडाजवळ आणायचा होता आणि जीभ बाहेर काढून साप चावल्याची अ‍ॅक्टिंग करायची होती. सेटवर जिवंत कोब्रा साप आणला गेला. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या त्या दिग्गज कलाकारने सापाचा फणा पकडला आणि तो आपल्या जिभेजवळ आणून अभिनयाला सुरूवात केली.

खलनायकाने जीभ बाहेर काढली अन्... -
अभिनेत्याने जीभ बाहेर काढली होती. सापाचा फणा अभिनेत्याच्या अगदी जिभेजवळच होता. मात्र, तो जीभ आत घेणार, तोच सापाने थेट त्यांच्या जिभेवरच दंश केला आणि संपूर्ण सेटवर एकच शांतता पसरली. मात्र, कोब्रा सापाचे विष आधीच काढण्यात आलेले आहे, हे दिग्दर्शक आणि त्या अभिनेत्याला आधीच ठाऊक होते. त्यामुळे जीवाला धोका नव्हता. हा अंगावर शहारे आणणारा स्टंट दुसरे-तिसरे कुणी नाही तर, खुद्द बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमरीश पुरी यांनी केला होता.

 

Web Title : सांप ने खलनायक की जीभ काटी; सेट पर छा गई शांति!

Web Summary : अशांति की शूटिंग के दौरान अमरीश पुरी ने जान जोखिम में डाली। एक सीन में कोबरा ने उनकी जीभ पर काटा, जिससे तनावपूर्ण माहौल बन गया। सौभाग्य से, सांप का विष निकाला गया था, जिससे खतरा टल गया।

Web Title : Snake bites villain's tongue on set; silence descends!

Web Summary : Amrish Puri risked his life during the 'Ashanti' shoot. A cobra bit his tongue during a scene, creating a tense atmosphere. Fortunately, the snake was de-venomed, averting danger and adding to his fearsome image.