Next

Chinmay Udgirkar Rupali Bhosale Come Together For Special Ganpati Song|रूपाली-चिन्मयचं 'देवा गणराया'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:30 AM2021-09-01T11:30:39+5:302021-09-01T11:30:57+5:30

सर्वांनाच सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचा हा उत्सव अगदी साधेपणानं साजरा करावा लागणारे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण बाप्पाच्या सेवेत हजर आहेत. कलाकार देखील आपल्या कलेतून बाप्पाची पूजा करताना पाहायला मिळातायेत. अभिनेत्री रूपाली भोसले आणि अभिनेता चिन्मय उद्गीरकर हे दोघंही बाप्पाच्या सेवेत रूजू झालेत. रूपाली आणि चिन्मय हे दोघंही बाप्पासाठी एक गाणं घेऊन आलेत. ‘देवा गणराया’ असं या गाण्याचं नाव आहे.