Arshdeep Singh Spot With His Rumoured Girlfriend : आयपीएल २०२६ मध्ये Arshdeep Singh मैदानातील कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील चर्चांमुळेही चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून तो पंजाबी अभिनेत्री समरीन कौरसोबत अनेकदा दिसत असून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. धर्मशाला येथील सामन्याआधी एका रेस्तराँमध्ये दोघे एकत्र दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पंजाब किंग्सचे काही अन्य खेळाडूही दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् सुरु झाली दोघांच्यात 'प्रेमाचा खेळ' रंगल्याची चर्चा
आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यावर अर्शदीपने एका तरुणीचा हातात हात घेतलेला फोटो शेअर केला होता. त्यानंतर समरीन कौरसोबतचे त्याचे नाव जोडले गेले.
पंजाब किंग्सच्या सामन्यादरम्यान ती सातत्याने त्याच्यासोबत वावरताना दिसली. संबंधित व्हिडिओ समोर आल्याने चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याबाबत चर्चा रंगताना दिसत आहेत. काही चाहते जलदगती गोलंदाजांला ट्रोल करत आहेत.
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
गर्लफ्रेंडसाठी तो हमाल झाल्याची गोष्टही गाजली
अलीकडेच टीमच्या प्रवासादरम्यान अर्शदीप सिंग कथित गर्लफ्रेंड समरीन कौरची बॅग उचलताना कॅमेऱ्यात कैद झाला. अर्शदीपचा हा रोमँटिक अंदाज अनेक चाहत्यांना आवडला असला तरी काही ट्रोलर्सना तो अजिबात पसंत पडलेला दिसला नाही. सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचा वर्षाव झाला असून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी त्याला थेट “पोर्टर सर्व्हिस” अशी उपमा दिली. काहींनी मैदानावर धुलाई झाल्यावर मैदानाबाहेर तो गर्लफ्रेंडसाठी हमाल झाल्याची प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.
IPL मध्ये खराब कामगिरी
अर्शदीप सिंग हा टी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. पण यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या १० सामन्यात त्याने फक्त ११ विकेट्स घेतल्या आहेत. लव लाइफमुळेच तो गोलंदाजीत कमी पडतोय, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगत असून काही क्रिकेट चाहते त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.