IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट

Suryakumar Yadav Hardik Pandya Mumbai Indians Captaincy: मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना RCB विरूद्ध रविवारी होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:14 IST2026-05-09T18:12:50+5:302026-05-09T18:14:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Will Suryakumar Yadav play or not What about Hardik Pandya fitness Who will captain Mumbai Indians See the update | IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट

IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट

Suryakumar Yadav Hardik Pandya Mumbai Indians Captaincy: मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात फारशी चांगली झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या १० सामन्यात त्यांना केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. यंदाच्या स्पर्धेतून मुंबईचा संघ जवळपास बाहेर झाला आहे. परंतु, उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करून लौकिकाला साजेसा खेळ करण्याचे संघापुढे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या संघाबाबत दोन महत्त्वाच्या अपडेट आल्या आहेत. यातील पहिली अपडेट ही हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत आहे, तर दुसरी अपडेट ही सूर्यकुमार यादव याच्या संघातील समावेशबाबत आहे.

हार्दिक पांड्या तंदुरूस्त आहे का?

गेल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळला नव्हता. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. रायपूरमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी, संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या बाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. कर्णधार हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे मागील सामना खेळू शकला नव्हता. या सामन्यातीलही त्याचा सहभाग अद्याप अनिश्चित आहे. हार्दिक संघासोबत रायपूरला गेला नव्हता. पण नंतर तो रायपूरला दाखल झाला. असे असले तरीही त्याच्या समावेशाबाबत निर्णय झालेला नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, शनिवारच्या दिवसात ९ मे रोजी हार्दिकची फिटनेस चाचणी होणार आहे. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास त्याला १० मे रोजी बंगळुरूविरुद्ध खेळता येणार आहे.

सूर्यकुमार 'बाबा' झाला, पुढचा सामना खेळणार?

हार्दिकच्या बाबतीतली परिस्थिती अस्पष्ट असली तरी, संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या बाबतीत एक दिलासादायक बातमी आहे. सूर्या आगामी सामन्यासाठी रायपूरमध्ये संघात सामील होणार आहे. मागील सामन्यात सूर्याने संघाचे नेतृत्व केले होते, पण अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्याला मुलगी झाली. त्यामुळे तो पुढच्या सामन्यात खेळू शकणार की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती. पण सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, आता तो या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच, आयत्या वेळी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दोघेही खेळू शकले नाहीत, तर संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे सोपवले जाऊ शकते.

 

Web Title : आईपीएल 2026: सूर्यकुमार की उपलब्धता, हार्दिक की फिटनेस, एमआई कप्तान अपडेट

Web Summary : मुंबई इंडियंस अनिश्चितता का सामना कर रही है। हार्दिक पांड्या की फिटनेस अगले मैच के लिए संदिग्ध है। सूर्यकुमार यादव पिता बनने के बाद टीम में शामिल होंगे। जसप्रीत बुमराह दोनों के अनुपलब्ध रहने पर नेतृत्व कर सकते हैं।

Web Title : IPL 2026: Suryakumar's Availability, Hardik's Fitness, MI Captain Update

Web Summary : Mumbai Indians face uncertainty. Hardik Pandya's fitness is questionable for the next match. Suryakumar Yadav will join the team after becoming a father. Jasprit Bumrah may lead if both are unavailable.