Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्मासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका महिला चाहतीचा फोन अचानक बंद पडतो. त्यानंतर रोहित शर्मा काय म्हणतो? ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 20:11 IST2026-05-09T20:10:07+5:302026-05-09T20:11:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma Funny Reaction to Fans Dead Phone Goes Viral Ahead of MI vs RCB Clash | Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!

Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. तो जिथे जातो, तिथे चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सध्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ज्यात रोहितची एक महिला चाहती त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपड करते. परंतु, रोहितसोबत सेल्फी घेण्याआधीच तिचा फोन बंद पडतो. त्यावेळी रोहित शर्मा असे काही बोलतो की, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्येही हास्याची लाट पसरते.

मुंबई इंडियन्सचा आगामी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रायपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ रायपूरमध्ये दाखल झाले असून, सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने ४२ सेकंदांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माबद्दल चाहत्यांमध्ये असलेली प्रचंड क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

व्हिडीओमध्ये एक महिला चाहती रोहित शर्माला प्रत्यक्ष पाहून अतिशय उत्साहित झालेली दिसते. ती तात्काळ त्याला हाक मारत सेल्फी घेण्यासाठी पुढे येते. रोहितही तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबतो. मात्र, सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या महिलेचा फोन अचानक बंद पडतो. त्यानंतर ती रोहितला, “माझा फोन बंद झाला आहे,” असे सांगते. यावर रोहित शर्माने आपल्या खास शैलीत, “आता मी काय करू?” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्याच्या या उत्तरानंतर आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हास्यकल्लोळ पसरला. अखेर त्या महिलेने दुसऱ्या फोनमधून रोहितसोबत सेल्फी घेतली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिला बाजूला केले आणि रोहित संघाच्या बसकडे रवाना झाला.

दरम्यान, रोहित शर्मा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर त्याने Lucknow Super Giants विरुद्धच्या सामन्यात ८४ धावांची दमदार खेळी केली होती. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. स्पर्धेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर रोहितचा फॉर्म संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, त्याचे अनुभवसंपन्न नेतृत्व युवा खेळाडूंनाही मोठी प्रेरणा देत आहे.

Web Title : रोहित शर्मा की हाजिरजवाबी: फैन का फोन बंद होने पर सब हंसे!

Web Summary : रोहित शर्मा के साथ सेल्फी लेते समय एक फैन का फोन बंद हो गया। उनकी मजाकिया प्रतिक्रिया से सब हंसे। रोहित का फॉर्म मुंबई इंडियंस के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Rohit Sharma's witty response to fan's phone malfunction amuses everyone.

Web Summary : During a meet, a fan's phone died before a selfie with Rohit Sharma. His humorous response sparked laughter. Sharma is in great form, crucial for Mumbai Indians' success.