“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:58 IST2026-05-09T18:56:19+5:302026-05-09T18:58:43+5:30
Arvind Kejriwal News: पंजाबची जनता आता मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे उभी राहील, असे दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Arvind Kejriwal News:पंजाबमधील प्रत्येक घरात ईडी धाडीची चर्चा होत आहे. मोदी आणि भाजपा ज्या प्रकारे पंजाबला वागणूक देत आहेत, त्याबद्दल लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजपाचे सदस्यही आपल्याच पक्षावर नाराज आहेत. मोदींना पंजाब कधीच कळला नाही. मोदी तुम्ही ईडीच्या आणखी चार धाडी टाका म्हणजे भाजपा आपल्या सर्व जागा गमावेल. तुम्ही ज्यांना अटक कराल, ते चार दिवसांनी सुटतील, पण भाजपा पुढील वीस वर्षे पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही, या शब्दांत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
पंजाब सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोडा यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने सकाळी संजीव अरोडा यांच्या चंडीगड येथील सरकारी निवासस्थानावर धाड टाकली होती. अनेक तास चाललेल्या कारवाईनंतर ईडीने संजीव अरोडा यांना अटक करण्यात आली. यावरून अरविंद केजरीवाल यांनी जोरदार चीका केली. एक पंजाबी व्यक्ती प्रेमापोटी सर्व काही देईल, पण जर तुम्ही त्याचा विश्वासघात केला, तर तो पूर्ण ताकदीने सूड घेईल, असा इशारा देत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली. यावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
पंजाबची जनता आता मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे उभी
पंजाबची जनता आता मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे उभी राहील आणि संपूर्ण देशाला मोदींच्या अन्यायकारक राजवटीतून मुक्त करण्यासाठी काम करेल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच अरविंद केजरीवाल यांनी शीख गुरूंचाही उल्लेख करत सांगितले की, आमच्या गुरूंनी औरंगजेबाच्या अत्याचारांना धैर्याने तोंड दिले आणि बलिदान दिले. पंजाबची जनता गुरूंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन अत्याचारांविरुद्ध लढेल. औरंगजेबाने अत्याचार करून भारताचे अनेक भाग काबीज केले होते, आज मोदींनीही बेईमानी करत भारताचे अनेक भाग काबीज केले आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिंग, फेमा उल्लंघन, जमिनीशी संबंधित प्रकरणे आणि संशयास्पद आर्थिक देवाणघेवाणीच्या चौकशीसाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने केवळ चंडीगडच नाही तर लुधियाना, जालंधर आणि गुरुग्राम शहरासह अनेक शहरांमध्ये धाडी टाकल्या. या कारवाईत संजीव अरोडा यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित कार्यालयेही चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. या कारवाईनंतर आम आदमी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
कई सौ साल पहले औरंगजेब ने अत्याचार करके भारत के कई हिस्सों पर कब्ज़ा कर लिया था.. आज मोदी जी ने भी बेईमानी करके भारत के कई हिस्सों पर कब्ज़ा कर लिया है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 9, 2026
औरंगजेब के अत्याचारों का हमारे गुरु साहिबान ने डटकर सामना किया और अपनी कुर्बानियाँ दीं।
अब उनकी कुर्बानियों से प्रेरित होकर… pic.twitter.com/QkXToZXfaE