कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:37 IST2026-05-09T18:34:45+5:302026-05-09T18:37:12+5:30
Vinesh Phogat Wrestling Dope Test: विनेश देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही, कारण काय?

कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
Vinesh Phogat Wrestling Dope Test: भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) महिला कुस्तीपटूविनेश फोगट हिच्यावर गैरशिस्त आणि उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महासंघाने तिच्यावर २६ जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली आहे. नाट्यमय घडामोडींनंतर ती गेल्या वर्षी निवृत्तीतून माघार घेऊन कुस्तीत परतली होती. गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन कुस्ती स्पर्धेत ती सहभागी होणार होती. पण जवळपास १८ महिन्यांनंतर कुस्तीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विनेशच्या कारकिर्दीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
Wrestling…
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) March 25, 2025
It’s a battle of heart, mind, and will.!!! 🙌✊
📸 @wrestlingpic.twitter.com/Szb5OhJPsD
विनेश फोगटवर मोठी कारवाई
विनेशला देण्यात आलेल्या १५ पानी नोटीसमध्ये, भारतीय कुस्ती महासंघाने विनेशवर गंभीर आरोप केले आहेत. महासंघाचे म्हणणे आहे की, तिच्या वर्तनाने देशाची प्रतिमा डागाळली आहे आणि भारतीय कुस्तीला हानी पोहोचली आहे. तिने डब्ल्यूएफआयची घटना, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे आंतरराष्ट्रीय नियम आणि उत्तेजक-विरोधी तरतुदींचे उल्लंघन केले आहे. महासंघाने विनेशकडून चार आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे: २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी वजन कमी करण्याचे निकष पूर्ण न केल्यामुळे अपात्रता, उत्तेजक द्रव्य-विरोधी नियमांनुसार ठिकाणाबाबत चुका आणि मार्च २०२४ मध्ये झालेल्या निवड चाचण्यांमध्ये दोन वेगवेगळ्या वजन गटांमध्ये स्पर्धा करणे हे तिच्यावरील आरोप आहेत.
डब्ल्यूएफआयने (WFI) स्पष्टपणे सांगितले आहे की, निवृत्तीतून परतणाऱ्या खेळाडूंसाठी डब्ल्यूएफआयच्या उत्तेजक-विरोधी नियमांनुसार आवश्यक असलेला सहा महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे विनेश कोणत्याही देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. या बंदीमुळे ती १० ते १२ मे दरम्यान गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेतूनही बाहेर राहील, ती स्पर्धा विनेशची पुनरागमनाची स्पर्धा असणार होती. विनेश फोगाटला या नोटीशीवर प्रतिसाद देण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
यशस्वी जैस्वालवरही कारवाईची टांगती तलवार
विनेश फोगाटच्या व्यतिरिक्त, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) भारतीय संघाची युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि महिला संघाची युवा सलामीवीर शफाली वर्मा यांना डिसेंबरमध्ये चाचणीसाठी उपलब्ध नसल्याबद्दल नोटीस बजावली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे ‘वेअरअबाउट्स क्लॉज’चे (खेळाडू कुठे आहे हे कळवण्याच्या अटीचे) उल्लंघन मानले जात असून, यशस्वी आणि शफाली यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. नाडाने दोन्ही संघांना नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे.