IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी

या दोन संघांचे प्लेऑफ्सचं तिकीट पक्के; उर्वरित दोन जागेसाठी तीन संघात चुरस

By सुशांत जाधव | Updated: May 9, 2026 18:44 IST2026-05-09T18:29:11+5:302026-05-09T18:44:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 R Ashwins Big Prediction These 4 Teams Including SRH RCB Will Qualify For Playoffs With PBKS But CSK Was Ignored MI Already Out | IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी

IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी

आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफ्सची शर्यत चांगलीच रंगतदार झाली आहे. १० फ्रँचायझी संघाने किमान १० सामने खेळल्यानंतरही अजून एकही संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. त्यामुळे आघाडीच्या चारमध्ये कोणते संघ पोहचणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटर आर. अश्विन याने प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. विशेष म्हणजे या दिग्गजाने यंदाच्या हंगामत दमदार कमबॅक करणाऱ्या CSK सह पाच वेळचा गत चॅम्पियन MI ची डाळ शिजणार नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

SRH आणि RCB चं तिकीट पक्के 

रविचंद्रन अश्विन याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना काही संघांचे प्लेऑफ्स तिकीट जवळपास पक्के असल्याचे म्हटले आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असून त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीबद्दल बोलताना आर. अश्विन म्हणाला आहे की, संघाने सर्व विभागात योग्य संतुलन साधले असून प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक सर्व गोष्टी आहेत. मागील सामन्यातील पराभवानंतर मोठ्या ब्रेकनंतर ते पण आता ते जोरदार पुनरागमन करतील. सनरायझर्स हैदराबादचा संघ दमदार फॉर्ममध्ये असून त्यांना रोखणं मुश्किलच वाटते, असे मतही त्याने मांडले. 

KL राहुलचा विक्रमवीर अवतार! स्टायलिश बॅटरचा IPL मधील ‘हा’ रेकॉर्ड मोडणं जवळपास अशक्य

उर्वरित दोन जागेसाठी ३ संघात स्पर्धा, CSK सह MI आउट 

अश्विन यांच्या मते उर्वरित दोन जागांसाठी गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चुरस पाहायला मिळेल. या तीन संघापैकी दोन संघ प्लेऑफ्समध्ये पोहचू शकतात. स्पर्धेत दमदार कमबॅक करणाऱ्या CSK सह 'जर तर'च्या समीकरणात अडकलेल्या MI ची डाळ शिजणार नाही, असे स्पष्ट मतही त्याने  मांडले आहे. चेन्नईला प्लेऑफ्समध्ये जायचे असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. १८ गुणांशिवाय त्यांना संधी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चारही सामने जिंकणे सोपे नाही, त्यामुळे चेन्नईचा संघ यंदा प्लेऑफ्समध्ये दिसणार नाही, असे अश्विनला वाटते. आर. अश्विन याने मुंबई इंडियन्स बद्दल थेट भाष्य केले नाही, पण मुंबईचा संघ सर्व सामने जिंकूनही केवळ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो आणि नेट रनरेट टिकवणे त्यांच्यासाठी अवघड जाईल, असे संकेत दिले. 

Web Title : आईपीएल 2026: दिग्गज अश्विन का अनुमान, प्लेऑफ में सीएसके, एमआई की मुश्किल राह

Web Summary : अश्विन का अनुमान है कि एसआरएच और आरसीबी प्लेऑफ में पहुंचेंगे। उनका मानना है कि जीटी, आरआर और पीबीकेएस बाकी स्थानों के लिए प्रतिस्पर्धा करेंगे, जबकि सीएसके और एमआई के लिए क्वालीफाई करना मुश्किल है।

Web Title : IPL 2026: CSK, MI unlikely for playoffs, predicts veteran Ashwin.

Web Summary : Ashwin predicts SRH and RCB will make the playoffs. He believes GT, RR, and PBKS will compete for the remaining spots, while CSK and MI are unlikely to qualify due to tough competition and net run rate concerns.