शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 19:50 IST2026-05-09T19:43:42+5:302026-05-09T19:50:21+5:30

PM Modi And DCM Eknath Shinde Meet In Kolkata: पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

what did pm modi and maharashtra deputy cm eknath shinde talk about during the oath ceremony of suvendu adhikari in west bengal all the details revealed | शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर

शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर

PM Modi And DCM Eknath Shinde Meet In Kolkata: पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी अगदी थाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपासह एनडीएतील अनेक मुख्यमंत्री, अनेक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. या सोहळ्यात एका घटनेने लक्ष वेधले, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांची झालेली भेट.

या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिवादन करत पुढे सरकत असताना अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ थांबत त्यांच्याशी चर्चा करताना दिसले. यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत हेलिकॉप्ट प्रवासात झालेल्या या घटनेबाबतची बातमी कानावर आली असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच यापुढे विमानप्रवास करताना अधिक काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली एकनाथ शिंदे यांची विचारपूस 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जाऊन आस्थेने चौकशी केली. गुरुवारी खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. त्यानंतर या हेलिकॉप्टरला जुहू येथील पवनहंस येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. पंतप्रधान मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत विचारपूस केली. तसेच यापुढे विमानप्रवास करताना काळजी घ्यावी, असा वडिलकीचा सल्लाही दिला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्याने यावेळी त्यांच्यात नक्की काय चर्चा झाली असावी, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांच्याबद्दल घडलेल्या या घटनेबाबत चौकशी करून आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत किती दक्ष आहोत हेच या छोट्याशा प्रसंगाद्वारे दाखवून दिले, असे म्हटले जात आहे.

Web Title : शपथ ग्रहण समारोह में मोदी ने शिंदे के हेलिकॉप्टर हादसे का हालचाल पूछा।

Web Summary : सुवेंदु अधिकारी के शपथ ग्रहण समारोह में, पीएम मोदी ने डीसीएम एकनाथ शिंदे की हेलीकॉप्टर दुर्घटना के बारे में पूछताछ की और भविष्य की यात्राओं के दौरान सावधानी बरतने की सलाह दी। इस बातचीत ने व्यापक दिलचस्पी पैदा की।

Web Title : Modi inquired about Shinde's well-being after helicopter incident at ceremony.

Web Summary : During Suvendu Adhikari's oath ceremony, PM Modi inquired about DCM Eknath Shinde's helicopter incident, advising caution during future travels. The interaction sparked widespread interest.