“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:59 IST2026-05-09T17:55:53+5:302026-05-09T17:59:48+5:30

Suvendu Adhikari Mother Gayatri Adhikari News: मुलगा सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होताच आई गायत्री अधिकारी या भावुक झाल्या. मुलाचे कौतुक करताना भाजपा सरकारकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे.

suvendu adhikari mother gayatri adhikari first reaction after taking oath as chief minister of west bengal and said bjp should fulfill promises | “RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा

“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा

Suvendu Adhikari Mother Gayatri Adhikari News: सुवेंदू अधिकारी लढवय्या आहे. असे दोन-तीन प्रसंग अगदी बिकट आले, जेव्हा त्यांच्या जीवावरच बेतले असते. परंतु, निकराने तो लढला. हा गुण सुवेंदूने त्याचे वडील शिशिर अधिकारी यांच्याकडून घेतला आहे, असे सांगताना सुवेंदू अधिकरी यांच्या मातोश्री गायत्री अधिकारी या भावुक झाल्या. आता आरजी कर प्रकरणातील पीडितेला खरा न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा गायत्री अधिकारी यांनी व्यक्त केली. मुलगा सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गायत्री अधिकारी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एनडीएतील अनेक मुख्यमंत्री, भाजपाचे नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडला. यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या आई गायत्री अधिकारी आनंद व्यक्त करत केला. माझ्यापेक्षा बंगालची जनता अधिक आनंदी आहे. गेली पाच वर्ष सुवेंदू अधिकारी यांनी मोठा संघर्ष केला. तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मोठी लढाई लढली, असे गायत्री अधिकारी यांनी नमूद केले. 

आता सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत

सुवेंदू अधिकारी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही त्याच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले, असे गायत्री अधिकारी यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम बंगालच्या जनतेसाठी काम करणे ही त्याच्यावर सर्वांत मोठी जबाबदारी आहे. विशेषतः आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेला खरा न्याय मिळावा, अशी इच्छा आहे, असे गायत्री अधिकारी यांनी स्पष्ट केले. महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि गरिबांचे कल्याण या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. बंगालच्या जनतेने भाजपावर विश्वास ठेवला असून, आता सरकारने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, असे गायत्री अधिकारी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी हे पूर्वी टीएमसीचे एक प्रमुख नेते आणि कांती लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार होते. अधिकारी कुटुंब २०२१ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये आले.
 

Web Title: suvendu adhikari mother gayatri adhikari first reaction after taking oath as chief minister of west bengal and said bjp should fulfill promises