नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे. ...
जिल्हा परिषदेने २१ लाख रुपयांची तरतूद करून सर्व ५८ सदस्यांना टॅब वाटले होते. यातील ३० सदस्यांनी टॅब जि.प.ला परत केला. मात्र २८ सदस्याकडे अजूनही टॅब असल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, तीत चर्चेअंती आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. ...
महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच जुन्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिली आहे. यात जिल्हा परिषदेंतर्गत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (२५१५-१२३८) या हेड सह ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा समावेश आहे ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवरून चांगलीच गाजली. जिल्ह्यातील १७ पाणी योजनांचे काम ठप्प, सौरउर्जेवर बसवलेले पंप, कंत्राटदाराने परत न केलेल्या सौर उर्जा बॅटऱ्या आणि शिंगणापूर निवासी शाळेतील शिक्षकाव ...
कोल्हापूर जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध् ...