जिल्ह्यातील शालेय शिक्षकांना मिळणार ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:29+5:30

प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध्ये ओळखपत्र दिले जाणार आहे.

Identity card will be given to school teachers in the district | जिल्ह्यातील शालेय शिक्षकांना मिळणार ओळखपत्र

जिल्ह्यातील शालेय शिक्षकांना मिळणार ओळखपत्र

googlenewsNext
ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियान : एक हजार १५७ शाळांचे चार हजार ५४७ शिक्षकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : समग्र शिक्षा अभियानाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांच्या शिक्षकांना शासनाच्या वतीने ओळखपत्र दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील एक हजार १५७ शाळांच्या चार हजार ५४७ शिक्षकांना ओळखपत्र देण्यासाठी दोन लाख २७ हजार ३५० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शालेय शिक्षणात अमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध्ये ओळखपत्र दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे ओळखपत्र जिल्हा अथवा तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. प्रती ओळखपत्रावर अधिकाधिक ५० रुपये खर्च करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या ओळखपत्राबाबत वस्तुनिष्ठ लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, तहसीलच्या सर्व शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यासाठी लागणारा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या गळ्यात आता शासनाचे अधिकृत ओळखपत्र दिसणार आहेत. आतापर्यंत काही उपक्रमशिल शिक्षक विद्यार्थ्यांसह आपले ओळखपत्र तयार करून घेत होते. त्यात सुसुत्रता नव्हती. त्यामुळे प्रत्येक शाळेचे ओळखपत्र वेगळे दिसत होते. आता यामुळे सर्व ओळखपत्र एकसारखे दिसतील.

शासकीय, १०० टक्के अनुदानीत शाळांच्या शिक्षकांना ओळखपत्र तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निधी पाठविण्यात आला आहे. या सत्रातच सर्व शिक्षकांना ओळखपत्र देण्यात येईल.
-वीरेंद्र गौतम,
सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा विभाग भंडारा

Web Title: Identity card will be given to school teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.