बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 22:27 IST2026-04-26T22:24:06+5:302026-04-26T22:27:07+5:30
ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल ६३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारला नवीन 'फ्लॅश चार्जिंग' तंत्रज्ञान देण्यात आले आहे...

बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
चिनी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी BYD ने 'ऑटो चायना २०२६' मध्ये नव्या जनरेशनची 'Atto 3' कार सादर केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने काही खास बदल केले आहेत. यामुळे ही कार आता पूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली, प्रशस्त आणि आधुनिक झाली आहे. या गाडीचे सर्वात मोठी खासियत म्हणजे, तिची रेंज आणि चार्जिंग तंत्रज्ञान आहे.
ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल ६३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारला नवीन 'फ्लॅश चार्जिंग' तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यामुळे बॅटरी १० टक्क्यांवरून ९७ टक्क्यांपर्यंत केवळ ९ मिनिटांतच चार्ज होऊ शकते. अर्थात आता एखाद्या वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी जेवढा वेळ लागतो. तेवढ्या वेळात ही कार चार्ज होऊ शकते.
७५० लिटर एवढा बूट स्पेस -
कंपनीने या एसयूव्हीची लांबी, रुंदी आणि उंची वाढल्याने ती रोडवरही प्रभावी दिसते. ७५० लिटरचा मोठा बूट स्पेस आणि बोनटखालीही १८० लिटरचे अतिरिक्त स्टोरेज, यामुळे ही कार विशेष बनते.
फीचर्स आणि परफॉर्मन्स
गाडीचे इंटीरियर अत्यंत प्रीमियम असून, यात मोठा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टंट फीचर्स (ADAS) मिळतात. काही व्हेरियंटमध्ये LiDAR आधारित ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग तंत्रज्ञानही दिले जाण्याची शक्यता आहे. यात सुरक्षित आणि टिकाऊ अशी नवीन जनरेशनची 'ब्लेड बॅटरी' वापरण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, भारतात ही कार केव्हा लाँच होणार? यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, Atto 3 ची लोकप्रियता पाहता ती लवकरच भारतीय बाजारातही दाखल होऊ शकते.