LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट

IPL 2026, LSG vs KKR Into Super Over : लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील इकाना स्टेडियमवर ...

By सुशांत जाधव | Updated: April 26, 2026 23:36 IST2026-04-26T23:36:05+5:302026-04-26T23:36:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 LSG vs KKR Mohammed Shami's Final-Ball Six Kartik Tyagi Takes LSG vs KKR Into Super Over | LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट

LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट

IPL 2026, LSG vs KKR Into Super Over : लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील इकाना स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात शेवटच्या कमालीचा थरार पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात १७ धावांची गरज असताना अजिंक्य रहाणेनं युवा गोलंदाज कार्तिक त्यागी याच्यावर भरवसा दाखवला. पण त्याने या षटकात टाकलेल्या दोन नो बॉलनंतर पाहायला मिळालेला ड्रामा अन् अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना मोहम्मद शमीनं मारलेला षटकार यामुळे यंदाच्या पहिल्यांदाच सुपर ओव्हर पाहायला मिळाली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अखेरच्या षटकात आधी नो बॉलचा ड्रामा 

मोहम्मद शमीनं कार्तिक त्यागीच्या पहिल्याच चेंडूवर बाइजच्या रुपात एक धाव  घेतली. कार्तिक त्यागीनं दुसरा चेंडू निर्धाव टाकला. पण तो चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर पुन्हा त्याने दुसरा नो बॉल टाकला. यावर हिम्मंत सिंगनं दोन धावा घेतल्या.  फ्री हिटवर चौकार मारत त्यानं संघाला विजयाच्या आणखी जवळ नेले. सलग दोन नो बॉल टाकल्यावर कार्तिक त्यागीचं षटक इथंच संपणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्याने टाकलेले नो बॉल  फलंदाजासाठी जोखीम निर्माण करणारा नसल्यामुळे त्याचे षटक कायम राहिले. 

"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?

 शमीचा षटकार अन्सु पर ओव्हरचं ट्विस्ट

अखेरच्या  ४ चेंडूत ८ धावा करायच्या असल्यामुळे सामना पुन्हा लखनौच्या बाजूनं झुकला होता. पण मोठा फटका मारण्याच्या नादात हिम्मत रिंकच्या हाती झेल बाद होऊन परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या प्रिन्स यादवनं चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. अखेरच्या २ चेंडूत ७ धावांची गरज असताना स्ट्राईकवर आलेल्या शमीला कार्तिकनं एक निर्धाव चेंडू टाकला. पण शेवटचा चेंडूवर शमीनं टप्प्यात आलेला चेंडू सीमारेषेपलीकडे धाडत सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

Web Title : LSG बनाम KKR: नो-बॉल ड्रामा! शमी का छक्का, सुपर ओवर ट्विस्ट।

Web Summary : LSG बनाम KKR मैच में शमी के आखिरी गेंद पर छक्के ने सुपर ओवर मजबूर कर दिया, क्योंकि कार्तिक त्यागी ने लगातार नो-बॉल डालीं। रोमांचक आखिरी ओवर ने प्रशंसकों को बांधे रखा।

Web Title : LSG vs KKR: No-ball drama! Shami's six, Super Over twist.

Web Summary : Shami's last-ball six in the LSG vs KKR match forced a Super Over after Kartik Tyagi bowled consecutive no-balls. The thrilling final over captivated fans.