शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 23:56 IST2026-04-26T23:55:15+5:302026-04-26T23:56:22+5:30

सावंतवाडी मुंबई ठाणे येथे दाखल आहेत गुन्हे...

Sagar Karivadekar, who was absconding under the pretext of making big returns in the stock market, was finally arrested. | शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात

शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात

सावंतवाडी : शेअर्स मार्केट मधून जादा परतावा देतो म्हणून सांगून शंभर ते दीडशे कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या सागर सुबोध कारिवडेकर  याला सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळी तो कारिवडे येथील आपल्या सासुरवाडीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचून नाट्यमयरित्या त्याला ताब्यात घेतले.

कारिवडेकर यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात पुणे येथील गुंतवणूकदारांच्या अंगावर गाडी घालत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे येथे ही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सहा महिन्यापूर्वी सावंतवाडी सर्वोदयनगर येथे शेअर्स मधील परताव्याची रक्कमेची विचारणा करण्यासाठी आलेल्या पुणे येथील पाच जणांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर कारिवडेकर यांच्यासह पाच जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील  शौनक सपकाळ रा. पुणे यांनी दिलेला तक्रारीवरून  तहा राजगुरू, तला राजगुरू राह   बांदा तसेच नितीन मेस्त्री र. कोलगाव या सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती तर सागर कारिवडेकर हा तेव्हापासून फरार होता.तो सावंतवाडी पोलिसांना हवा होता.

तर  सावंतवाडीत घडलेल्या घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या उद्देशाने आणखी काहि गुंतवणूक दाराना सागर कारिवडेकर याने गंडा घातला होता त्याच्या रक्कमेचा परतावा ही वेळेत दिला नव्हता त्यामुळेच या सर्व ठेवीदारांनी मुंबई ठाणे येथील पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या  होत्या या तक्रारींचा तपास ठाणे आर्थिक गुन्हा शाखा करत आहे.

 याप्रकरणी ठाणे येथील पोलिसांनी सागर कारिवडेकर याचा ठाणे पोलिसांकडून सावंतवाडीतील बंगला गाड्या तसेच सावंतवाडीसह वेगुर्ले येथील मालमत्ता ही जप्त केल्या होत्या.तसेच त्याची बॅक खातीही गोठवण्यात  आली होती.या गुन्ह्य़ाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हा शाखा वेगाने करत आहे.त्यामुळेच सागर कारिवडेकर याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.

त्यातच रविवारी कारिवडेकर हा आपल्या सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील सासुरवाडीला येणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव, महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला त्याला ताब्यात घेतले.

सध्या त्याला सावंतवाडी पोलिसांकडून पुणे येथील तक्रारदार सकपाळ, देवकाते वगैरे गुंतवणूकदार यांच्यावर हल्ला प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title : शेयर बाजार में धोखेबाज सागर कारिवडेकर सावंतवाड़ी में गिरफ्तार।

Web Summary : शेयर बाजार में करोड़ों की धोखाधड़ी के आरोपी सागर कारिवडेकर को कारिवडे में गिरफ्तार किया गया। उस पर हत्या के प्रयास और कई शहरों में धोखाधड़ी के आरोप हैं। पुलिस ने उसकी संपत्ति जब्त कर ली थी, और सक्रिय रूप से उसकी तलाश कर रही थी।

Web Title : Fraudster promising high stock returns arrested in Sawantwadi after absconding.

Web Summary : Sagar Karivadekar, accused of a stock market scam involving crores, was arrested in Karivade. He faces charges including attempted murder and fraud across multiple cities. Police had seized his assets, and were actively searching for him.