LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

रिंकूची कमाल; वादळी खेळीसह खास विक्रमाला गवसणी

By सुशांत जाधव | Updated: April 26, 2026 23:03 IST2026-04-26T22:53:25+5:302026-04-26T23:03:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 LSG vs KKR Rinku Singh Scores 83 As No. 6 Batter Against LSG, Breaks MS Dhoni's 15-Year-Old Record | LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

IPL 2026, LSG vs KKR Rinku Singh Breaks MS Dhoni's 15-Year-Old Record :  कोलकाता नाईट रायडर्सचा उप कर्णधार रिंकू सिंग याने रविवारी लखनौ सुपर जाएंट्सविरुद्ध संघ अडचणीत असताना आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावंसख्या उभारली. ७३ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला असताना रिंकूनं 'मैं हूँ ना' शो! दाखवला.  लखनौच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या  सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिंकूनं ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची नाबाद खेळी केली.  त्याने सुनील नरेनसोबत आठव्या विकेटसाठी ३० चेंडूत ६२ धावांची भागीदारी करत KKR ला २० षटकांत ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवलं. एवढेच नाही या कामगिरीसह त्याने MS धोनीचा विक्रम मोडीत काढला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

धोनीचा विक्रम मोडला

या खेळीच्या जोरावर रिंकूने पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखाली फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकलं.  या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अव्वलस्थानी आहे. २०१९ च्या हंगामात पांड्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर ३४ चेंडूत ९१ धावांची खेळी साकारली होती. त्यापाठोपाठ या यादीत आंद्रे रसेलचा नंबर लागतो. केकेआरकडून २०१८ च्या हंगामात मसल पॉवर रसेल याने चेन्नई विरुद्ध ३६ चेंडूत ८८ धावांची खेळी केली होती. रिंकू सिंह LSG विरुद्धच्या वादळी खेळीसह तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?

IPL मध्ये सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वाधिक धावांचा विक्रम 

  • हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ९१ धावा (३४ चेंडू), २८ एप्रिल २०१९
  • आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ८८* धावा (३६ चेंडू), १० एप्रिल २०१८
  • रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स) विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स , ८३* धावा (५१ चेंडू), २८ एप्रिल २०२६
  • एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्स) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, ७०* धावा (४० चेंडू), २२ मे २०११
  • रायन टेन डोशाटे (कोलकाता नाईट रायडर्स) विरुद्ध  मुंबई इंडियन्स, ७०* धावा (४९ चेंडू), २५ मे २०११
  • कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ७० धावा (३४ चेंडू), २४ एप्रिल २०१५
  • दिनेश कार्तिक (दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ६९ धावा (३८ चेंडू), ३१ मार्च २०१०
  • शार्दुल ठाकूर (कोलकाता नाईट रायडर्स) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, ६८ धावा (२९ चेंडू), ६ एप्रिल २०२३

Web Title : LSG vs KKR: रिंकू सिंह का धमाका, तोड़ा धोनी का रिकॉर्ड!

Web Summary : रिंकू सिंह ने लखनऊ के खिलाफ नाबाद 83 रन बनाकर आईपीएल में एमएस धोनी का रिकॉर्ड तोड़ा। उन्होंने छठे या उससे नीचे बल्लेबाजी करते हुए सर्वाधिक रन बनाए। उनकी पारी ने केकेआर को 155 तक पहुंचाया। हार्दिक पांड्या अभी भी शीर्ष पर हैं।

Web Title : Rinku Singh's heroics overshadow LSG vs KKR; Dhoni's record broken.

Web Summary : Rinku Singh's unbeaten 83 against LSG broke MS Dhoni's record for highest score batting at number six or lower in IPL. His power-packed innings helped KKR reach 155, surpassing Dhoni's previous record. Hardik Pandya still tops the list.