बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 23:42 IST2026-04-26T23:41:09+5:302026-04-26T23:42:15+5:30

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मशरूम बनवण्याच्या या कंपनीतून  येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज साफ करण्यासाठी एक कर्मचारी टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरला. तो बाहेर येईना म्हणून दुसरा ही कर्मचारी खाली उतरला.

Three workers suffocate to death while cleaning drainage tank in Belsar | बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 

बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 

जेजुरी, दि. २६ बेलसर (तवा. पुरंदर ) येथील वाडा ऍग्रो मशरूम कंपनीत पाण्याच्या ड्रेनेज टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या उत्तरप्रदेश मधील तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत पिंटू राजेश प्रसाद (वय २३)रा. खोराराम जि. देविरया व्यास सोहम कुमार (वय २२) रा. नवतम जि. देविरया, गौतम रामसूरन कुशवाहा ( वय ३६) रा. मेदनापूर, ता. रुद्रपूर  जि. देवरिया  अशी असून जेजुरी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. 

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मशरूम बनवण्याच्या या कंपनीतून  येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज साफ करण्यासाठी एक कर्मचारी टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरला. तो बाहेर येईना म्हणून दुसरा ही कर्मचारी खाली उतरला. बराच वेळ तो ही बाहेर येत नाही म्हणून तिसरा टाकीत उतरला. तिघे ही बाहेर  आले नाही  म्हणून शेजारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांना आवाज देऊन ही काहीच प्रतिसाद येत नाही म्हणून त्यांनी जेसीबीं बोलावून ड्रेनेज वरील स्लॅब फोडून त्यांना बाहेर काढले.

तिघांना ही जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सदर ड्रेनेज टाकीत उष्णतेमुळे गॅस तयार झाला असावा. साठलेल्या गॅस मुळे त्यांचा गुदमरून जागेवरच मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे हे करीत आहेत. 

Web Title : बेळसर में ड्रेनेज टैंक साफ करते समय तीन मजदूरों की दम घुटने से मौत

Web Summary : बेळसर में एक मशरूम कंपनी में ड्रेनेज टैंक की सफाई करते समय उत्तर प्रदेश के तीन मजदूरों की दम घुटने से मौत हो गई। गैस बनने के कारण उनका दम घुट गया। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Three Workers Die of Suffocation Cleaning Drainage Tank in Belesar

Web Summary : Three Uttar Pradesh workers died in Belesar while cleaning a drainage tank at a mushroom company. They suffocated due to gas buildup. Police are investigating the incident.