ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 20:10 IST2026-04-26T20:10:00+5:302026-04-26T20:10:42+5:30

ही घटना स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ (होमलँड प्लॅटफॉर्म) येथे घडली. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. शासकीय रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत युवक भिकारी किंवा मनोरुग्ण असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Youth dies of electric shock while boarding train, touches OHE wire; Power supply disrupted, case registered with Railway Police | ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

संग्रहित फोटो...


नागपूर :  रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी एका युवकाने अचानक फलाटावर उभी असलेल्या ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला जबर विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तो खाली कोसळला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ (होमलँड प्लॅटफॉर्म) येथे घडली. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. शासकीय रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत युवक भिकारी किंवा मनोरुग्ण असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ वर्षांचा एक युवक रविवारी दुपारी नागपूर स्थानकावर आला होता. दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास तो होमलँड प्लॅटफॉर्मच्या गुड्स सायडिंगवर उभी असलेल्या कोळसा भरलेल्या मालगाडीवर अचानक चढला. मात्र, काही क्षणांतच तो ट्रेनच्या वर असलेल्या ओएचई वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला तीव्र विजेचा धक्का बसून तो खाली पडला. जवळ जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले.

दरम्यान, या घटनेत ओएचई वायर तुटल्याने काही काळ विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. माहिती मिळताच ओएचई पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी सांगितले की, मृताची ओळख अद्याप पटलेली नसून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Youth dies of electric shock while boarding train, touches OHE wire; Power supply disrupted, case registered with Railway Police