Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली. ...
येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत ...
आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांचे प्रश्न सोडविणारे असल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने जळगाव व सांगली महापालिकांची सत्ता भाजपाला मिळाली. ...
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. ...
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. ...