सणबूर, ता. पाटण येथील दोन सख्ख्या व एक चुलत बहिणींसह आजोबा वांग नदीच्या पात्रातून वाहून गेले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाहून जाणाऱ्या दोन मुलींना व आजोबांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर एका मुलीचा दुपारपर्य ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतक ...
एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं. ...
या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
बुधवारी दुपारी वन विभागाने प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात पिंजरा लावला होता. त्यामध्ये फळे ठेवण्यात आली होती. सुरुवातीला एक मोठे माकड फळाच्या आकर्षाने पिंज-यात गेले आणि ते अडकले. ...
कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिक ...