वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळेनासे झाले आहे. रात्री, खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. तिगाव, आमलावासींना ये-जा करण्याकरिता हा एकमे ...
भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या ...
शहरात कोंडवाडे असूनही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मोकाट जनावरे एक दिवस मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही. ...
वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. ...
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्य ...
धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली. ...