धानोरा-रांगी मार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:43 AM2019-08-28T00:43:49+5:302019-08-28T00:44:10+5:30

धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली.

Danora-queue route dangerous | धानोरा-रांगी मार्ग धोकादायक

धानोरा-रांगी मार्ग धोकादायक

Next
ठळक मुद्देअर्धा मार्ग गेला खरडून : डागडुजी करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा-रांगी या १८ किमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. काही ठिकाणी अर्धा मार्ग पूर्णपणे वाहून गेला आहे. याठिकाणावरून ट्रकसारखे जड वाहन नेताना कसरत करावी लागत आहे. अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली. काही ठिकाणी मार्ग खरडून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. वाहन या खड्ड्यामध्ये गेल्यास उलटण्याची शक्यता अधिक राहते. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करणे अतिशय धोकादायक आहे. पर्याय नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धानोरा तालुक्यातील धानोरा-रांगी हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून धानोरा-ब्रम्हपुरी बस चालते. दरदिवशी शेकडो कर्मचारी या मार्गाने ये-जा करतात. रात्रीच्या सुमारास खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सदर मार्गाची किमान डागडुजी करावी, अशी मागणी अनेकवेळा या परिसरातील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र बांधकाम विभाग सुस्त आहे.

Web Title: Danora-queue route dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.