बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. ...
पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...
पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ...
पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला. ...