राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sheetal Pharakate NCP Rebel : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शीतल फराकटे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार पंचायत समिती निवडणुकीबद्दल बोलत होते. भाषण करत असताना अजित पवार आकडेवारी सांगत होते, त्याचा वेगळाच अर्थ लावत उपस्थितांनी लावला. त्यानंतर अजित पवारांनाही हसू आवरले नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुणे जिल्ह्यात महापालिका निवडणूक एकत्र लढले. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही पक्ष कायमचे एकत्र येण्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत. ...