धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. ...
पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. बडे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याने पवार कुटुंबाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. ...