बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ...
लग्नानंतर आयुष्य बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात. ...
बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे. १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. ...
फराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिका पादुकोणने डेब्यू केला होता. आता फराह खान आणखी एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च करतेय. ...
अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे. ...