देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून शुक्रवारी प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीचे ... ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात पक्षांतर्गत दबाव गट निर्माण करण्यासाठी विदर्भातील चव्हाण विरोधकांनी माजी खासदार नाना पटोले यांना समोर करून रणनीती आखली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग् ...
देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. ...
आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. ...