हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:51 IST2026-05-12T11:49:55+5:302026-05-12T11:51:47+5:30

लग्नाच्या दिवशी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणि इतर कामांची धावपळ करत असताना दत्तात्रय यांची प्रकृती खालावली. 

A heartbreaking incident of a father dying on his daughter's wedding day took place in Mokhada taluka of Palghar district. | हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना

हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना

-रवींद्र साळवे, मोखाडा
एका पित्याच्या आयुष्यात सर्वांत सुखाचा क्षण म्हणजे मुलीला आयुष्यभरासाठी चांगला साथीदार शोधून देऊन तिची आनंदाश्रूने पाठवणी करणे. मात्र, शनिवारी रात्री उत्साहात मुलीला हळद लावणाऱ्या पित्याचा दुसऱ्या दिवशी लग्नात अक्षता टाकण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली मोखाडा तालुक्यात घडली. 

मोखाडा तालुक्यातील दत्तात्रय उबाळे (६०) हे तहसील कार्यालयात नोकरीस होते. वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतली. चार मुलींचे वडील असलेले उबळे यांनी आपल्या दोन मुलींची लग्ने आधी केलेली आहेत आणि हर्षदा ही त्यांची तिसरी मुलगी. तिच्या लग्नाची गेल्या महिनाभरापासून त्यांची लगबग होती. 

शनिवारी तिच्या हळदीचा कार्यक्रमही त्यांनी जोरदार केला. १० मे रोजी दुपारी लग्न होते. या सोहळ्याच्या दिवशी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणि इतर कामांची धावपळ करत असताना दत्तात्रय यांची प्रकृती खालावली. 

११ वाजण्याच्या आसपास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी घरात आराम केला. मात्र, तरीही बरं वाटत नसल्याने त्यांची दुसरी मुलगी, जावई आणि नातेवाइकांनी त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिक येथे हलविले आणि तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

...अन् लग्न विवाह सोहळा संपन्न 

वडिलांना बरे वाटत नसल्याची बाब नवरीला समजली. मात्र, उपचार सुरू आहेत. यामुळे लग्नकार्य थांबविण्यापेक्षा ते उरकून घेऊ. ते उपचार करून घरी परत येतील, अशी समज सर्व नातेवाइकांनी काढली आणि दुपारी अडीच वाजता लग्नसोहळा पार पाडला. 

मात्र, वडिलांच्या मृत्यूची बातमी उशिरापर्यंत नवरीला दिली नव्हती. लग्नासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केलेल्या वडिलांचे असे अकाली निधन होणे ही बाब सर्वांसाठी वेदनादायी ठरली.

Web Title : हल्दी समारोह के बाद बेटी की शादी से पहले पिता की मौत

Web Summary : मोखाड़ा के एक पिता, अपनी बेटी की शादी की तैयारी कर रहे थे, शादी से ठीक पहले समारोह के दौरान अस्वस्थ महसूस करने के बाद उनका दुखद निधन हो गया। योजना के अनुसार शादी हुई, दुल्हन को बाद तक अपने पिता की मृत्यु के बारे में पता नहीं चला। इस घटना से सभी लोग बहुत दुखी हुए।

Web Title : Father Dies Before Daughter's Wedding After Joyful Haldi Ceremony

Web Summary : A father from Mokhada, preparing for his daughter's wedding, tragically passed away shortly before the ceremony after feeling unwell during the pre-wedding festivities. The wedding proceeded as planned, with the bride unaware of her father's death until later. The event brought immense sadness to all involved.

टॅग्स :palgharपालघर