कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 

By सोमनाथ खताळ | Updated: May 12, 2026 12:48 IST2026-05-12T12:46:19+5:302026-05-12T12:48:09+5:30

७ ऑगस्ट २०२५ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला होता. आज या योजनेमुळे ७७० आरोग्य साथी फडावर कार्यरत आहेत.

Abandoning the sickle, she grabbed the medicine box! Sugarcane harvester woman is now a 'doctor madam' on the farm; Beed pattern is a model for the state | कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 

कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 

-सोमनाथ खताळ, बीड 
हातामध्ये कोयता आणि डोक्यावर उसाची मोळी, हे बीडच्या ऊसतोड कामगारांचे पारंपरिक चित्र आता पालटू लागले आहे. ज्या हातांनी आजवर फक्त ऊस तोडला, तेच हात आता फडावर जखमी मजुरांच्या जखमांवर मलमपट्टी करत आहेत. ऊसतोड महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर सुरू झालेली ‘आरोग्य साथी’ योजना आता स्थलांतरित मजुरांसाठी खऱ्या अर्थाने ‘लाइफलाइन’ ठरत आहे. फडावरील या महिलांची ओळख आता ‘डॉक्टर मॅडम’ म्हणून होऊ लागली आहे. 

या आजारांवर फडातच उपचार

ताप, अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, निर्जलीकरण (शोष) टाळणे, त्वचारोग, जखम निर्जंतुकीकरण, खाज, खाज सुटणे (खरुज), जखमा, पू येणे, जखम स्वच्छ करणे, जखम बांधणे, ताप मोजणे, पट्टी बांधणे आदी आजारांवर फडातच उपचार केले जात आहेत. या आजाराच्या गोळ्या आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य त्यांना दिले आहे. 

‘बीड पॅटर्न’ राज्यासाठी दिशादर्शक 

स्थलांतरामुळे ऊसतोड मजुरांचा सरकारी आरोग्य यंत्रणेशी संपर्क तुटत असे; मात्र आरोग्य साथींमुळे आता आरोग्य यंत्रणाच मजुरांच्या झोपडीपर्यंत पोहोचली आहे. यामुळे केवळ जीव वाचत नाहीत, तर मजुरांचा आत्मविश्वासही वाढत आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन या महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, हा उपक्रम आता राज्यासाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरत आहे.

१०७५ कामगारांना सेवा

७ ऑगस्ट २०२५ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला होता. आज या योजनेमुळे ७७० आरोग्य साथी फडावर कार्यरत आहेत. मागील हंगामात जिल्ह्यातील १०७५ ऊसतोड कामगारांना या महिलांनी उसाच्या फडावरच आरोग्य सेवा पुरवली आहे.

Web Title : हँसिया छोड़ा, दवा पेटी थामी: बीड की महिलाएँ बनीं डॉक्टर!

Web Summary : बीड की 'आरोग्य साथी' योजना गन्ना काटने वाली महिलाओं को गन्ना खेतों में साथी मजदूरों को बुनियादी चिकित्सा देखभाल प्रदान करने के लिए प्रशिक्षित करती है। यह पहल प्रवासी श्रमिकों के लिए स्वास्थ्य सेवा पहुंच के मुद्दों को संबोधित करती है, सामान्य बीमारियों के लिए साइट पर उपचार प्रदान करती है और महाराष्ट्र के लिए एक मॉडल बन रही है।

Web Title : From Sickle to First Aid: Beed's Women Cane Cutters as Medics.

Web Summary : Beed's 'Arogya Saathi' scheme trains women cane cutters to provide basic medical care to fellow laborers at sugarcane farms. This initiative addresses healthcare access issues for migrant workers, offering on-site treatment for common ailments and is becoming a model for Maharashtra.