Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:53 IST2026-05-12T13:50:21+5:302026-05-12T13:53:47+5:30
Pakistan IED Blast : पाकिस्तानच्या लक्की मरवत जिल्ह्यात मंगळवारी एक मोठा बॉम्बस्फोट झाला. सराय नौरंग बाजार परिसरात झालेल्या या IED स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या लक्की मरवत जिल्ह्यात मंगळवारी एक मोठा बॉम्बस्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सराय नौरंग बाजार परिसरात झालेल्या या IED स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ ट्रॅफिक पोलीस आणि ३ नागरिकांचा समावेश आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट तेव्हा झाला जेव्हा पोलिसांचा एक ताफा त्या परिसरातून जात होता. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने सुरक्षा दलांना टार्गेट करून हा स्फोट घडवून आणला. हा आत्मघाती हल्ला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र अधिकार्यांकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज दूरवर ऐकू आला.
A bomb explosion occurred in Naurang Bazaar of Lakki Marwat, resulting in casualties and injuries to around fifteen people, including three traffic police personnel. Sadly, even in such critical circumstances, our provincial and national parliament members remain busy
— Lal Wazir journalist in PAK -AFG (@LalWazir19) May 12, 2026
1/ https://t.co/gEQ58yWaVapic.twitter.com/Hisie59q1o
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
स्फोटानंतर बाजार परिसरात एकच धावपळ उडाली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटामुळे अनेक दुकानं आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.
दहशतवादी घटनांमध्ये वाढ
२०२२ नंतर पाकिस्तानातदहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः अफगाण सीमेलगतच्या भागात सुरक्षा दल आणि सार्वजनिक ठिकाणांना टार्गेट करून सतत हल्ले केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. दहशतवादी कारवाया आणि वाढती अस्थिरता लक्षात घेता, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी परिसरात शोध आणि सुरक्षा मोहीम राबवली आहे. या घटनेचा प्रत्येक अँगलतून तपास केला जात असून दोषींना लवकरच पकडण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.