Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:00 IST2026-05-12T13:58:56+5:302026-05-12T14:00:38+5:30

मनाली सुखदरे यांची चारित्र्याच्या संशयातून अंबोली परिसरात शस्त्राने हत्या करण्यात आली. मित्र अमोल महिरे याला अवघ्या दोन तासांत अंबोली पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली.

Mumbai Crime: Beautician Manali murdered in Amboli; Friend arrested in Ghatkopar within just two hours | Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक

Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक

मुंबई : मीरा रोड येथे ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनाली सुखदरे (४२) यांची चारित्र्याच्या संशयातून अंबोली परिसरात शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्यांचा मित्र अमोल महिरे याला अवघ्या दोन तासांत अंबोली पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली. त्याच्यावर ९ मे रोजी गुन्हा नोंदवला.

मनाली यांची लहान भावजय भारती सावंत यांनी याप्रकरणी तक्रार दिली. मनाली यांनी ७ मे रोजी दुपारी भारती यांना फोन करून रत्नागिरी जिल्ह्यात साखरपा येथे लग्नाच्या मेकअपची ऑर्डर मिळाली होती. 

९ मे रोजी सकाळी अंधेरीहून गाडी असल्याने ८ मे रोजी अंबोली येथील घरी मुक्कामासाठी येणार असल्याचे सांगितले. मात्र, उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने भारती यांनी त्यांना फोन केला असता, त्या मीरा रोडहून निघाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संपर्क झाला नाही. 

उपचारादरम्यान झाला मृत्यू

मनाली यांना मारहाण करण्यात आली असून, त्या रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती चाळीतील रहिवासी कल्पना पोवळ यांनी मध्यरात्री भारती यांना फोनद्वारे दिली. 

त्यानंतर भारती, त्यांचे पती आणि मुलगी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांच्या शेजारी रक्ताने माखलेला चाकू आढळला. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ९ मे रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आईशी वाद घालत मारहाण

महिरे याने आईशी वाद घालून तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मनाली यांच्या मुलीने सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत अंबोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. 

अवघ्या दोन तासांत घाटकोपर येथून महिरेच्या मुसक्या आवळल्या. तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे अधिकारी म्हणाले. 

Web Title : मुंबई: ब्यूटीशियन मनाली की हत्या; मित्र घाटकोपर में गिरफ्तार

Web Summary : मुंबई में ब्यूटीशियन मनाली सुखदरे की अंबोली में हत्या, अवैध संबंध के शक में। पुलिस ने दो घंटे में दोस्त अमोल महिरे को घाटकोपर से गिरफ्तार किया। उस पर पहले भी धमकी देने का आरोप है।

Web Title : Mumbai Beautician Murdered: Friend Arrested in Ghatkopar Within Hours

Web Summary : Mumbai beautician Manali Sukhadre was murdered in Amboli over suspicions of infidelity. Police arrested her friend, Amol Mahire, in Ghatkopar within two hours. He'd allegedly threatened her mother previously. Investigation ongoing.