'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:12 IST2026-05-12T15:02:53+5:302026-05-12T15:12:33+5:30

NEET Exam 2026 Latest Update: नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NEET Exam 2026 Latest Update Maharashtra connection behind NEET paper leak! Paper leaked from Jaipur suspected to have been printed in Nashik | 'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय

'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय

NEET Exam 2026 Latest Update: नाशिक : नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आला आहे. या पेपर फुटीचे केंद्र नाशिक असल्याचे तपासात उघड झाले असून यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जयपूरमधील पेपर तयार करणाऱ्या एजन्सीकडून हा पेपर सर्वात आधी लीक झाला आणि त्याची पहिली कॉपी नाशिकमध्ये काढण्यात आल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधून पेपर लीक झाल्यानंतर तो नाशिकमध्ये आणण्यात आला. नाशिकमध्ये या पेपरची पहिली प्रिंट काढली. त्यानंतर हा पेपर हरयाणात पाठवण्यात आला, तिथे त्याचे १० वेगवेगळे सेट्स तयार करून ते देशातील इतर राज्यांमध्ये वितरीत करण्यात आले. या साखळीत नाशिक हे एक महत्त्वाचे केंद्र असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणी नाशिक पोलिसांनी कारवाई करत इंदिरानगर भागातील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचा आणि काही नामांकित कोचिंग क्लासेसचा या पेपर फुटीत काय संबंध आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयिताचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील डेटावरून अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

नाशिक पोलिसांनी फक्त या एका संशयिताचीच नाही, तर शहरातील इतर काही संशयास्पद क्लासेस आणि व्यक्तींचीही चौकशी सुरू केली आहे. हा पेपर किती विद्यार्थ्यांना विकला आणि यासाठी किती पैशांची देवाणघेवाण झाली, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Web Title : नीट पेपर लीक: महाराष्ट्र कनेक्शन का संदेह, नाशिक प्रिंटिंग लिंक?

Web Summary : नीट पेपर लीक का मामला महाराष्ट्र के नाशिक तक पहुंचा। जयपुर से लीक होने के बाद पहली प्रिंटिंग नाशिक में हुई। पुलिस एक संदिग्ध और कोचिंग क्लास की जांच कर रही है।

Web Title : NEET Paper Leak: Maharashtra Connection Suspected, Nashik Printing Link?

Web Summary : NEET's leaked paper trail leads to Nashik, Maharashtra. Initial prints originated there after leaking from Jaipur. Police are investigating a suspect and coaching classes for involvement in the paper leak.