कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:17 IST2026-05-12T16:16:25+5:302026-05-12T16:17:17+5:30

कल्याणमधील एका १५ वर्षीय मुलीवर ७८ वर्षीय भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

78-year-old Bhondubaba sexually assaults minor girl in Kalyan | कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कल्याण - कल्याणमधील एका १५ वर्षीय मुलीवर ७८ वर्षीय भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शाहिद मोहम्मद वाहिद शेख याला अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन पीडित मुलगी ही शिक्षण घेत आहे. ती तिच्या आईसोबत राहते. तिचे वडील आणि आजी या दोघांचे निधन झाले आहे. तिच्या घरात काही तरी बाधा झाली आहे. पीडित मुलीच्या आईची ओळख शाहिद शेख याच्यासोबत होती. मुलीच्या आईने शाहिद शेख याला घरात काही तरी बाधा आहे. ती दूर करण्याचा विषय शाहिद शेख याला सांगितला होता. शाहिद शेख याने घरातील बाधा दूर करण्यासाठी पूजा करावी लागली असे सांगितले.

पूजा करण्याच्या बहाण्याने पीडित मुलीची आई घरी नसताना तो घरी आला होता. दोन वेळा तो पीडित मुलीच्या घरी आला. तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. घडला प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी शाहिद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करुन कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्याला १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शाहिद शेख हा अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन्ही ठिकाणी राहतो. सध्या तो उल्हासनगरला राहत असल्याची माहिती समाेर आली आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? अशा प्रकारे या भोंदूबाबा शाहिद शेख याने अन्य किती लोकांसोबत असा प्रकार केला आहे. या अंगाने पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली आहे.

Web Title: 78-year-old Bhondubaba sexually assaults minor girl in Kalyan