संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:43 IST2026-05-12T16:43:18+5:302026-05-12T16:43:45+5:30

एका पिझ्झा शॉपचा मालक पिझ्झा तयार करताना त्यावर थुंकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

police arrest man after pizza splitting video in noida | संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं

संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये ऊसाचा रस आणि रोटीवर थुंकण्याच्या घटनांनंतर आता एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सेक्टर-२२ मधील एका पिझ्झा शॉपचा मालक पिझ्झा तयार करताना त्यावर थुंकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुझम्मिल असं या आरोपीचं नाव असून संतप्त नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-२४ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौडा गावात मुझम्मिल 'पिझ्झा हंट' नावाचं दुकान चालवतो. हिंदू रक्षा दल खोडाचे अध्यक्ष सोनू शर्मा यांनी सांगितलं की, त्यांना या दुकानात पिझ्झावर थुंकून तो ग्राहकांना विकला जात असल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, त्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रविवारी आरोपीला असं कृत्य करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर लोकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

आरोपीचा अजब दावा

पोलीस चौकशीत मुझम्मिलने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. "पिझ्झाचा बेस तयार करताना त्यावर साचलेले जास्तीचे पीठ काढण्यासाठी मी फक्त फुंकर मारत होतो" असा दावा त्याने केला आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या १ मिनिट २२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तो संशयास्पद कृत्य करताना स्पष्ट दिसत असल्याचं सांगितलं जात आहे.

परिसरात संतापाची लाट

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि भावनांशी खेळणाऱ्या अशा व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हिंदू संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "सेक्टर-२२ मधील पिझ्झा दुकानातील कर्मचाऱ्याचा अयोग्य कृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे."

Web Title : पिज़्ज़ा बनाते समय थूका; आक्रोश, जनता ने पीटा।

Web Summary : उत्तर प्रदेश में एक पिज़्ज़ा शॉप के मालिक को पिज़्ज़ा पर थूकते हुए पकड़ा गया। आरोपी मुज़म्मिल को स्थानीय लोगों ने पीटा और पुलिस को सौंप दिया। उसने दावा किया कि वह सिर्फ अतिरिक्त आटा उड़ा रहा था।

Web Title : Pizza maker spits on pizza; outrage, beaten by public.

Web Summary : A pizza shop owner in Uttar Pradesh was caught spitting on pizzas. The accused, Muzammil, was beaten by locals and handed over to the police. He claimed he was only blowing off excess flour.