“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:23 IST2026-05-12T15:22:45+5:302026-05-12T15:23:20+5:30

Congress MP Rahul Gandhi Reaction On NEET 2026 Exam Cancelled: नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

congress mp rahul gandhi big reaction about neet 2026 cancelled due to paper leak issue and criticized system | “२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले

“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले

Congress MP Rahul Gandhi Reaction On NEET 2026 Exam Cancelled: नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात असून, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. २२ लाख विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग, स्वप्ने धुळीला मिळाली, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नीट २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेने २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. काही विद्यार्थ्यांच्या वडिलांनी कर्ज घेतले, काही विद्यार्थ्यांच्या आईने आपले दागिने विकले, लाखो मुलांनी रात्रभर अभ्यास केला, आणि त्या बदल्यात त्यांना पेपरफुटी, सरकारी दुर्लक्ष आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार मिळाला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा

हे केवळ एक अपयश नाही, तर तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. प्रत्येक वेळी पेपर माफिया निसटून जातो, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता, लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्याच मानसिक तणावाचा, आर्थिक बोजाचा आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागेल. जर एखाद्याचे भविष्य मेहनतीने नव्हे, तर पैसा आणि प्रभावाने ठरत असेल, तर शिक्षणाला अर्थ तरी काय उरेल? पंतप्रधानांचा तथाकथित 'अमृतकाळ' देशासाठी 'विषकाळ' बनला आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.

दरम्यान, एनटीएकडून ३ मे रोजी नीट २०२६ ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट होताच एनटीएने केंद्र सरकारच्या परवानगीने ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. तसेच ३ मे रोजी जिथे परीक्षा दिली तिथेच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता  येईल, असे सांगण्यात आले आहे.  

Web Title : नीट 2026 परीक्षा रद्द; राहुल गांधी नाराज़, लाखों सपने चकनाचूर

Web Summary : पेपर लीक के कारण नीट 2026 परीक्षा रद्द, आक्रोश फैल गया। राहुल गांधी ने सरकार की आलोचना की, छात्रों की दुर्दशा को उजागर किया। उन्होंने इसे भ्रष्टाचार और सरकारी लापरवाही के कारण युवाओं के खिलाफ अपराध बताया।

Web Title : NEET 2026 Exam Canceled; Rahul Gandhi Condemns, Millions of Dreams Shattered

Web Summary : NEET 2026 exam cancelled due to paper leak, sparking outrage. Rahul Gandhi criticizes the government, highlighting the plight of students whose efforts were wasted. He calls it a crime against the youth, caused by corruption and government negligence.