टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?

Team India ICC ODI Rankings: भारतीय संघ अव्वल असला तरीही एक चिंतेची बाब आहे, जाणून घ्या त्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:04 IST2026-05-12T16:58:12+5:302026-05-12T17:04:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Team India is number 1 in ODIs after T20 in icc rankings Big blow to Pakistan see who is in which position | टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?

टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?

Team India ICC ODI Rankings: भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. वार्षिक अपडेट नंतरही भारतीय संघ जगातील एकदिवसीय संघांच्या यादीत अव्वलस्थानी कायम राहिला आहे, परंतु यावेळी आघाडीचे अंतर किंचित कमी झाली आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला न्यूझीलंड आता भारतापेक्षा केवळ पाच रेटिंग गुणांनी मागे आहे, ज्यामुळे येत्या काही महिन्यांत अव्वल स्थानासाठीची लढत अधिक रोमांचक होणार आहे.

पाकिस्तानची घसरण, कोण कुठल्या स्थानी?

ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय संघाकडे ११८ रेटिंग गुण आहेत. टीम इंडियाने एक रेटिंग गुण गमावला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडकडे ११३ गुण आहेत, तर विश्वविजेता ऑस्ट्रेलिया १०९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिका आता १०२ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे, तर पाकिस्तान ९८ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंका ९६ गुणांसह सहाव्या, अफगाणिस्तान (९३ गुण) सातव्या, इंग्लंड (८९ गुण) आठव्या, बांगलादेश (८४ गुण) नवव्या आणि वेस्ट इंडिज (७४ गुण) दहाव्या स्थानावर आहे. ताज्या क्रमवारीत, आयर्लंडने झिम्बाब्वेला मागे टाकत ११ वे स्थान पटकावले आहे. दरम्यान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) १३ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर संयुक्त अरब अमिरातीने (UAE) कॅनडाला मागे टाकत १९ वे स्थान मिळवले आहे.


क्रमवारी विश्वचषकासाठी महत्त्वाची

हे क्रमवारीतील अद्यतन केवळ आकड्यांपुरते मर्यादित नाही, तर ते आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२७ साठीच्या थेट पात्रतेशी देखील जोडलेले आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल आठमध्ये असलेले संघ आगामी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी आधीच थेट प्रवेश निश्चित केला आहे. जर दक्षिण आफ्रिका अव्वल आठमध्ये कायम राहिली, तर नवव्या स्थानावरील संघालाही विश्वचषकात थेट स्थान मिळवण्याची अधिक संधी मिळेल.

Web Title : टीम इंडिया वनडे रैंकिंग में शीर्ष पर, पाकिस्तान फिसला: पूरी रैंकिंग

Web Summary : आईसीसी वनडे रैंकिंग में भारत शीर्ष पर बरकरार, न्यूजीलैंड करीब से पीछा कर रहा है। दक्षिण अफ्रीका ने पाकिस्तान को पछाड़ा, जो पांचवें स्थान पर खिसक गया। 2027 विश्व कप के लिए सीधे क्वालीफाई करने के लिए रैंकिंग महत्वपूर्ण है।

Web Title : Team India Tops ODI Rankings, Pakistan Slips: Full Standings

Web Summary : India retains its top spot in ICC ODI rankings, closely followed by New Zealand. South Africa overtakes Pakistan, who drops to fifth. The rankings are crucial for direct qualification for the 2027 World Cup, with the top eight teams gaining automatic entry.