शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:39 IST2026-05-12T14:00:15+5:302026-05-12T14:39:01+5:30
Mumbai Mayor Ritu Tawde Village Tour Photos: या विश्रांतीमुळे शरीराला पुन्हा चैतन्य मिळाले असून, जोमाने व उत्साहाने मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचेही रितू तावडे म्हणाल्या आहेत

Mumbai Mayor Ritu Tawde Village Tour Photos:
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कोकणात आपल्या गावी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत सोबत रम्य निसर्गाचे फोटो शेअर केलेत.

समाजकारण आणि राजकारणाच्या या अखंड धावपळीत अनेकदा स्वतःसाठी दोन क्षण काढणेही दुरापास्त होते, असे रितू तावडे यांनी लिहिले आहे.

रितू तावडे म्हणतात की, गावाला जाऊन मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. निसर्गरम्य वातावरणात, झोपाळ्यावर बसून झोका घेत त्यांनी मनसोक्त वेळ घालवला.

समाजकारण आणि राजकारणाच्या या अखंड धावपळीत अनेकदा स्वतःसाठी दोन क्षण काढणेही दुरापास्त होते, असे रितू तावडे यांनी लिहिले आहे.

शहरातल्या गजबजाटापासून दूर, त्या थंड हवेच्या झुळुकीत झोपाळ्यावर डुलकी घेताना जो आनंद मिळाला, तो शब्दांत सांगता येणार नाही, असे त्यांनी लिहिले.

पुढे त्या म्हणतात, खूप दिवसांनी अशी गाढ आणि शांत झोप लागली, ज्यामुळे मनावरचा सगळा ताण हलका झाला. ती 'मजा' काही वेगळीच होती! या विश्रांतीमुळे शरीराला पुन्हा चैतन्य मिळाले.

मनाला खूप बरं वाटलंय. आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि उत्साहाने तुमच्या सेवेसाठी मी सज्ज आहे, असे वचन रितू तावडे यांनी दिले आहे.

सर्व फोटो सौजन्य- रितू तावडे सोशल मीडिया

















