ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:12 IST2026-05-12T15:11:23+5:302026-05-12T15:12:11+5:30

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका सुताराने ज्या घरात गुप्त लॉकर बनवला, तिथेच ३० लाखांची चोरी केली.

Whoever made a 'secret' pocket in the cupboard, cleaned his hands! Artisan absconds after stealing Rs 30 lakhs | ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार

AI Generated Image

एखाद्या चित्रपटालाही शोभावी अशी चोरीची घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या सुतारावर विश्वास ठेवून घराच्या कपाटात 'सिक्रेट लॉकर' बनवून घेतला, त्याच सुताराने घरातील ३० लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. 'घरचा भेदी' ठरलेल्या या सुताराने अत्यंत खुबीने ही चोरी केली, मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ताहिर अली यांनी ९ मे रोजी आपल्या घरातून मोठ्या प्रमाणावर दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. ताहिर अली यांनी आपल्या कपाटात एक असा गुप्त कप्पा बनवला होता, ज्याची माहिती घरातील व्यक्तींशिवाय कोणालाही नव्हती. मात्र, तरीही चोरट्याने थेट त्याच कप्प्यावर हात साफ केल्याने पोलीसही चक्रावून गेले होते.

विश्वासू सुतारच निघाला चोर

तपासादरम्यान पोलिसांना मोसिम नावाच्या सुतारावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोसिमनेच तीन महिन्यांपूर्वी ताहिर अली यांच्या कपाटात तो गुप्त लॉकर तयार केला होता. काही दिवसांपूर्वी त्या लॉकरचा लॉक खराब झाल्याने त्याला दुरुस्तीसाठी पुन्हा बोलावण्यात आले होते. दुरुस्ती करत असताना मोसिमची नजर लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर पडली. इतकी मोठी माया पाहून त्याचा नियत फिरली आणि त्याने चोरीचा कट रचला.

असा आखला चोरीचा कट

मोसिमने सलग तीन दिवस ताहिर अली यांच्या घराची रेकी केली. घरचे लोक कधी बाहेर जातात आणि कधी येतात, याची त्याने इत्यंभूत माहिती काढली. १० मे रोजी योग्य संधी साधून त्याने घरात प्रवेश केला. त्याला लॉकर कुठे आहे हे आधीच ठाऊक असल्याने, त्याने कोणताही गोंधळ न घालता थेट ३० लाखांचे दागिने आणि रोकड लंपास केली.

पोलिसांची कारवाई आणि बक्षीस

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी २४ तासांच्या आत मोसिमला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सोन्याचे हार, अंगठ्या, चैन, नथ, चांदीची पैंजण आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीणा यांनी या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title : सीक्रेट कप्पा बनाने वाले बढ़ई ने 30 लाख की चोरी की, फरार!

Web Summary : उत्तर प्रदेश में एक बढ़ई ने गुप्त तिजोरी बनाकर 30 लाख रुपये के गहने चुरा लिए। पुलिस ने धोखेबाज बढ़ई को गिरफ्तार कर लिया, जिसने अपराध कबूल कर लिया। चोरी का माल और नकदी बरामद।

Web Title : Carpenter who built secret compartment stole ₹30 lakh, flees!

Web Summary : A carpenter in Uttar Pradesh, who built a secret safe in a cupboard, stole ₹30 lakh worth of valuables. Police arrested the betraying carpenter after he confessed to the crime, recovering the stolen goods and cash.