मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:35 IST2026-05-12T12:23:52+5:302026-05-12T12:35:21+5:30
NEET UG 2026 exam cancelled: ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आहेत.

मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
NEET Exam 2026 Latest Update: नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आहेत.
एनटीएकडून ३ मे रोजी नीट २०२६ ची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याचे दावे केले जात होते. दरम्यान, या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट होताच एनटीएने केंद्र सरकारच्या परवानगीने ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. तसेच ३ मे रोजी जिथे परीक्षा दिली तिथेच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असे सांगण्यात आले आहे.
National Testing Agency, with the approval of the Government of India, has decided to cancel the NEET (UG) 2026 examination conducted on 3 May 2026, and to re-conduct the examination on dates that will be notified separately. pic.twitter.com/fh4o4QtzfI
— ANI (@ANI) May 12, 2026
वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील पदवीच्या प्रवेशांसाठी नीटची परीक्षा घेतली जाते. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र आता पेपरफुटीमुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आल्याने त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसणार आहे.