बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:52 IST2026-05-12T13:51:04+5:302026-05-12T13:52:49+5:30

Apara Ekadashi May 2026: अपरा एकादशी व्रताची सांगता कशी करावी? जाणून घ्या...

vaishakh apara ekadashi 2026 know about date shubh muhurat vrat puja vidhi and significance in marathi | बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता

बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता

Apara Ekadashi May 2026: प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशीचे व्रत केले जाते. श्रीविष्णूंच्या सेवेसाठी एकादशीचे व्रत सर्वोत्तम मानले जात आहे. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास असणार आहे. त्यामुळे वैशाख महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी विशेष मानली जात आहे. बुधवार, १३ मे २०२६ रोजी वैशाख वद्य पक्षातील अपरा एकादशी आहे. बुधवार हा श्रीविष्णूंच्या पूजेसाठी उत्तम मानला जातो. बुधवारी ही एकादशी येत असल्यामुळे या दिवसाचे आणि व्रताचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. 

वैशाख महिन्याची आता सांगता होणार आहे. वैशाख महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी अपरा एकादशी नावाने ओळखली जाते. या व्रताची फलनिष्पत्ती पापनाश आणि जाणता अजाणता घडलेल्या चुकांचे परिमार्जन अशी सांगितली आहे. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. अपरा एकादशी पुण्यफलदायी आहे, असे शास्त्र सांगते. श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते. 

अपरा एकादशी: बुधवार, १३ मे २०२६

वैशाख वद्य एकादशी प्रारंभ: मंगळवार, १२ मे २०२६ रोजी दुपारी ०२ वाजून ५२ मिनिटे.

वैशाख वद्य एकादशी समाप्ती: बुधवार, १३ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजून २९ मिनिटे.

भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे वैशाख वद्य अपरा एकादशीचे व्रताचरण बुधवार, १३ मे २०२६ रोजी करावे, असे सांगितले जाते. अपरा एकादशी दिनी करण्यात येणाऱ्या गंगा स्नानाला विशेष महत्त्व प्राप्त होते, असे मानले जाते.

अपरा एकदाशीला ‘असे’ करा व्रत पूजन

अपरा एकादशीला सकाळी लवकर उठावे. शुचिर्भूत होऊन व्रत पूजनासाठी तयार व्हावे. व्रताचरण आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. पंचामृत अभिषेक करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे. 

अपरा एकादशी व्रताची सांगता कशी करावी?

अपरा एकादशीला जागरण करून भजन, कीर्तनात रात्र जागवावी, असे सांगितले जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

 

Web Title : अपरा एकादशी २०२६: तिथि, पूजा विधि, महत्व और मान्यता

Web Summary : अपरा एकादशी २०२६ में १३ मई को है। यह एकादशी क्षमा मांगने और बाधाएं दूर करने के लिए महत्वपूर्ण है। विष्णु पूजा, जाप और दान के साथ व्रत करें जिससे सुख और समृद्धि मिले। विधि का पालन करें और अगले दिन व्रत तोड़ें।

Web Title : Apara Ekadashi 2026: Date, Puja Rituals, Significance and Importance

Web Summary : Apara Ekadashi in 2026 falls on May 13th. This Ekadashi is significant for seeking forgiveness and removing obstacles. Observe the fast with Vishnu Puja, chanting, and charity for happiness and prosperity. Follow rituals and break the fast the next day.