Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:18 IST2026-05-11T11:15:26+5:302026-05-11T11:18:54+5:30
Rohit Pawar And Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या याच सल्लावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचं आवाहन केलं. 'वर्क फ्रॉम होम', ऑनलाईन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा. पेट्रोल-डिझेलची बचत करणं ही राष्ट्रीय गरज आहे असं सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या याच सल्लावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. "भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला हे आधी सांगण्याची गरज आहे. असं केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच "आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते..." असंही रोहित यांनी म्हटलं.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "तेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाला दिला.. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरुवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल…"
तेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाला दिला.. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 11, 2026
आता भाजपाने टार्गेट…
"अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका"
"आता भाजपाने टार्गेट ठेवलेल्या राज्यातील निवडणुका तर झाल्या आहेत, त्यामुळे ‘निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करु नका’ असं आता म्हणता येणार नाही, पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका… भ्रष्टाचार करु नका.. उधळपट्टी करु नका… अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका… अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करु नका… हे भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला आधी सांगण्याची गरज आहे. असं केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही."
"राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
"महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये यासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखलं तर सरकारवर कुणी टीकाही करणार नाही आणि देशही अडचणीत येणार नाही. (आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते...)" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.