खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:56 IST2026-05-11T11:56:01+5:302026-05-11T11:56:46+5:30
Uttar Pradesh Amroha Murder Case: पोटच्या गोळ्याला संपवण्यासाठी आई-वडिलांनीच ५ लाख रुपयांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील शमपुर गावात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख पटवली आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक खुलासा समोर आला. आई-वडिलांनीच मुलाच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या आई-वडीलांसह चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी येत असे आणि घरातील सदस्यांसोबत वारंवार वाद घालत असे. त्याच्या या वागणुकीमुळे कुटुंबीय त्रस्त झाले होते. या सततच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांच्या संमतीने मृताच्या धाकट्या भावाने आपल्या एका मित्राच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचे समोर आला. घटनेच्या दिवशी आरोपींनी मृताच्या डोक्यात दगडाने जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह रस्त्यातच टाकून दिला.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक लखन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मृत तरुणाच्या आई-वडिलांसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मृत तरुणाविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल होते. राजाबपूर पोलीस ठाण्यात गॅस सिलिंडर चोरी आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता, अशीही माहिती देण्यात आली आहे.