"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:41 IST2026-05-11T12:38:16+5:302026-05-11T12:41:32+5:30
तृषाने तिचे फोटो शेअर एक क्रिप्टिक कॅप्शन दिलं आहे. काय म्हणते तृषा कृष्णन?

"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून थलापती विजयने १० मे २०२६ रोजी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला अभिनेत्री तृषा कृष्णनने आपली आई उमा कृष्णन यांच्यासह हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर तृषाने काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर शेअर केलेली पहिली पोस्ट व्हायरल झाली आहे. तृषाने तिचे फोटो शेअर एक क्रिप्टिक कॅप्शन दिलं आहे. काय म्हणते तृषा कृष्णन?
तृषा कृष्णनने विजयच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुंदर साडी नेसली होती. निळ्या रंगाच्या प्युअरर सिल्क साडीमध्ये तृषा अगदी अप्सराच दिसत होती. त्यावर तिने स्कीन रंगाचा कॉन्ट्रास्ट डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता. गळ्यात नाजुक हार घातलेला आहे. केसांचा अंबाडा करुन त्यावर तिने छानसा मोगऱ्याचा गजरा माळला होता. तिच्या पारंपरिक सौंदर्यावर चाहते फिदा झाले. तृषाने तिचे याच लूकमधील फोटो आता इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले,"Love is always louder - प्रेम हे कायमच श्रेष्ठ असते."
विजय आणि तृषा यांच्यातील नात्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून अफवांचे पेव फुटले असताना, तृषाच्या या सूचक कॅप्शनने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर, शपथविधीनंतर विजय जेव्हा जनतेला संबोधित करत होता, तेव्हा तृषा भावुक झालेली दिसली. 'आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते' अशी प्रतिक्रियाही तिने दिली.
कधी सुरु झाल्या विजय आणि तृषाच्या नात्याच्या चर्चा?
थलापती विजय आणि तृषा कृष्णन यांच्या रिलेशनशिपची चर्चा गेल्या दोन दशकांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रंगत आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री केवळ पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. विजय आणि तृषा यांनी पहिल्यांदा २००४ साली 'गिल्ली' या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले. या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर 'थिरुपाची', 'आथी' आणि 'कुरुवी' अशा सलग चित्रपटांमुळे त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री सुपरहिट ठरली. याच काळात त्यांच्या अफेअरच्या चर्चा पहिल्यांदा सुरू झाल्या होत्या.काही काळानंतर या जोडीने एकत्र काम करणे थांबवले. विजय आपल्या कौटुंबिक आयुष्यात व्यस्त झाला, तर तृषाने इतर मोठ्या स्टार्ससोबत चित्रपट केले. . विजयचे लग्न संगीतासोबत झाले होते, तर तृषाचे नावही इतर काही सेलिब्रिटींशी जोडले गेले. २०२४-२५ दरम्यान विजय आणि तृषा लंडनमध्ये एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.