अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:22 IST2026-05-11T13:16:48+5:302026-05-11T13:22:59+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील पांगडी गावात पत्नीने आपल्या प्रियकरासह मिळून पतीला विजेचा करंट देऊन मारण्याचा कट रचला. मात्र, पती बचावला आणि पत्नीसह प्रियकर गजाआड झाला.

Wife's sensational plot to kill husband for having an immoral relationship; Attempt to electrocute him fails | अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला

AI Generated Image

लग्नबेडीत अडकल्यानंतरही विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तहसील अंतर्गत येणाऱ्या पांगडी गावात उघडकीस आली आहे. आपल्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला विजेचा धक्का देऊन संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पती यातून थोडक्यात बचावला असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मोरे (रा. पांगडी) हे आपल्या घरात गाढ झोपेत असताना ही घटना घडली. ३ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी कवडी मोरे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने विजेच्या वायरला ॲल्युमिनियमची तार जोडून गजानन यांच्या शरीराला करंट लावला. अचानक बसलेल्या जोरदार धक्क्यामुळे गजानन यांची झोप उडाली आणि ते ओरडत जागे झाले. या घटनेत गजानन यांच्या दोन्ही हातांचे वरचे भाग गंभीर भाजले आहेत.

अनैतिक संबंधांतून रचला कट

गजानन मोरे यांनी पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कवडी हिचे गावातीलच विष्णू कडू आत्राम याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांची माहिती गजानन यांना मिळाल्यापासून घरात वाद सुरू होते. गजानन आपल्या मार्गातून कायमचा दूर व्हावा, या उद्देशाने या दोघांनी मिळून गजानन यांना संपवण्याची योजना आखली होती.

असा झाला भांडाफोड

विजेचा झटका लागल्यानंतर गजानन यांनी तातडीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. वडगाव जंगल पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घरातून विजेच्या तारा आणि इतर साहित्य जप्त केले. प्राथमिक तपासानंतर ८ मे रोजी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि ६२(२) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू आत्राम या दोघांनाही अटक केली. शांत समजल्या जाणाऱ्या पांगडी गावात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.  पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.

Web Title : पत्नी ने प्रेमी संग पति को मारने की साजिश रची; करंट से हमला विफल।

Web Summary : यवतमाल में, एक पत्नी ने अपने प्रेमी के साथ मिलकर अवैध संबंध के चलते पति को करंट से मारने की कोशिश की। पति बच गया, और पुलिस ने पत्नी और उसके प्रेमी दोनों को गिरफ्तार कर लिया। घटना ने बेवफाई और वैवाहिक कलह से प्रेरित एक चौंकाने वाली योजना का खुलासा किया।

Web Title : Wife plots husband's murder for affair; electrocution attempt fails.

Web Summary : In Yavatmal, a wife, with her lover, tried to electrocute her husband due to an affair. The husband survived, and police arrested both the wife and her lover. The incident exposed a shocking plan fueled by infidelity and marital discord.