Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:39 IST2026-05-11T14:37:55+5:302026-05-11T14:39:09+5:30

Telangana Mahbubnagar Accident: तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात रविवारी रात्री उशीरा अत्यंत धक्कादायक घटना घडली.

Telangana Accident: Terrible accident involving sports bike and car; 5 people including three from the same family die! | Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!

Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!

तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात रविवारी रात्री उशीरा अत्यंत धक्कादायक घटना घडली. स्पोर्ट्स बाईक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर काही वेळातच महबूबनगर बायपास रस्त्यावर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, कार यू-टर्न घेत असतानाच, भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्पोर्ट्स बाईकने तिला जोराची धडक दिली. अपघातात बाईकवर स्वार असलेले दोघे जण जागीच ठार झाले. तर, कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि मृतांची ओळख पटवली. या दुर्घटनेत महबूबनगरचे रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अर्शा बेगम (वय, ३२), उपेजा बेगम (वय, ७) आणि उमर बेगम (वय, २) अशी त्यांची नावे आहेत. तर, याजुब अफझल (वय, २५ वर्षे) असे मृत दुचाकीस्वारचे नाव आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

Web Title : तेलंगाना दुर्घटना: स्पोर्ट्स बाइक और कार की टक्कर में बच्चों समेत पाँच की मौत

Web Summary : तेलंगाना में स्पोर्ट्स बाइक और कार की भीषण टक्कर में एक ही परिवार के दो बच्चों सहित पाँच लोगों की मौत हो गई। हादसा महबूबनगर बाईपास पर हुआ जब कार यू-टर्न ले रही थी और तेज रफ्तार बाइक ने टक्कर मार दी। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Telangana Accident: Sports Bike, Car Collision Kills Five, Including Children

Web Summary : A devastating collision in Telangana between a sports bike and car killed five, including two children from one family. The accident occurred on the Mahbubnagar bypass when the car made a U-turn and was struck by the speeding bike. Police are investigating.