'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:38 IST2026-05-11T15:13:50+5:302026-05-11T15:38:14+5:30

लोकप्रिय यूट्यूबर आणि बिग बॉस १७ फेम तेहलका भाईची पत्नी दीपिका आर्या हिलाही कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे. एका जाहिरातीसाठी तिला तिच्या दिसण्याशी तडजोड करण्यास सांगितले होते.

If you want work, you have to compromise Demand from famous YouTuber's wife; Blackmail also reported | 'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती

'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती

लोकप्रिय यूट्यूबर सनी आर्या उर्फ ​​तेहलका भाईची पत्नी, दीपिका आर्या, ही सुद्धा एक इन्फ्लुएन्सर आहे. तेहलकाप्रमाणेच, त्याची पत्नी दीपिका सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. ती तिच्या पतीसोबत प्रँक व्हिडीओ बनवते. आता, एका पॉडकास्ट दरम्यान, दीपिकाने एक मोठा खुलासा केला आहे, यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

दीपिका म्हणाल्या की, तिला मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचे होते, पण जाहिरात क्षेत्रात काम करण्यासाठी तिला तडजोड करण्यास भाग पाडले गेले, यामुळे तिला भीती वाटली.

एक्सपायर झालेल्या कुठल्याही क्रीमचा ‘असा’ करा वापर, कुरकुरणारे दरवाजे-गंजलेल्या बॅग चकाचक-५ टिप्स

दीपिका आर्या एका पॉडकास्टमध्ये म्हणाली, "माझी एक मैत्रीण होती. तिच्यामार्फत माझा मुंबईतल्या एका व्यक्तीशी संपर्क झाला. मला सांगण्यात आलं की, तुला एक जाहिरात मिळाली आहे. तुला इतर शोमध्येही काम दिलं जाईल आणि भविष्यातही तुला काम मिळत राहील. तू मुंबईला यायला हवं."

दीपिका म्हणाली, "त्यांनी मला तिकीटं पाठवताच सांगितलं की, मला मुंबईला जाऊन तडजोड करावी लागेल. त्यावेळी मला तडजोडीचा अर्थ माहीत नव्हता. मला वाटलं की तिथे जाऊन मला संघर्ष करावा लागेल. माझ्या फ्लाईटच्या आदल्या रात्री त्यांनी मला फोनवर तडजोडीचा अर्थ समजावून सांगितला आणि मी खूप घाबरले होते."

मला त्यांनी ब्लॅकमेलही केले

"मग तो मला ब्लॅकमेल करू लागला, म्हणाला, 'तू हे स्वतःहून करायला तयार झाली आहेस. जर तू तडजोड करायला नकार दिलास किंवा आली नाहीस, तर मी तुझ्या वडिलांना कॉल रेकॉर्डिंग पाठवीन, यामध्ये तुमच्या मुलीने होकार दिला आहे असे लिहिलेले असेल.'" यावेळी मी त्या माणसाला सांगितले की ती स्वतःच माच्या वडिलांना याबद्दल सांगेल.

दीपिका तिचा नवरा तेहलकासोबत प्रँक व्हिडीओ देखील बनवते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे, इंस्टाग्रामवर तिचे २६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Web Title : काम के लिए यूट्यूबर की पत्नी से 'समझौते' की मांग, ब्लैकमेल की कोशिश

Web Summary : यूट्यूबर तेहलका भाई की पत्नी दीपिका आर्या ने खुलासा किया कि उन्हें विज्ञापन में काम के लिए 'समझौता' करने के लिए कहा गया। बाद में उसे ब्लैकमेल किया गया, उसके पिता को झूठी रिकॉर्डिंग भेजने की धमकी दी गई। दीपिका ने बहादुरी से ब्लैकमेलर का सामना किया और घटना का खुलासा किया।

Web Title : Youtuber's Wife Faced 'Compromise' Demand for Work, Blackmail Attempt

Web Summary : Deepika Arya, wife of YouTuber Tehelka Bhai, revealed she was asked to 'compromise' for work in advertising. She was later blackmailed, with threats to send a false recording to her father. Deepika bravely confronted the blackmailer and disclosed the incident.