ऋतू बदलला की आपण उत्साहात महागडे मॉइश्चरायझर, कोल्ड क्रीम किंवा बॉडी लोशन विकत घेतो, पण ते पूर्ण संपण्याआधीच त्यांची 'एक्सपायरी डेट' निघून जाते. त्वचेवर रॅशेस येतील या भीतीने आपण त्या टाकून देतो. मात्र, पैशांची नासाडी करण्यापेक्षा या क्रीम्सचा स्मार्ट वापर करणे कधीही उत्तम. (Polishing old furniture using expired lotions)
घरात सौंदर्य प्रसाधनांचा वापर करताना एखादी क्रीम एक्सपायर झाली की आपण ती लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. पण ज्या क्रीम्स त्वचेसाठी वापरण्यायोग्य उरल्या नाहीत, त्या घराच्या स्वच्छतेसाठी मात्र एक वरदान ठरू शकतात. महागड्या ब्रँडच्या या क्रीम्समध्ये असे काही घटक असतात जे घराचा कोपरा चमकवण्यासाठी एखाद्या 'मॅजिकल ट्रिक'सारखे काम करतात.(hacks for expired skincare products) एक्सपायर क्रीम्समध्ये असलेले ऑइल्स आणि फॅट्स घरातील चामड्याच्या वस्तू, धातूचे शोपीस आणि अगदी लाकडी फर्निचरला नवीन चमक देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.(Budget-friendly home cleaning tips) जाणून घेऊया, एक्सपायर क्रीम्स फेकून न देता त्यांचा घरातील प्रत्येक कोपरा चमकवण्यासाठी कसा वापर करायचा.
आरशात स्वतःला पाहून म्हणाल... 'वाह!' १ रुपयाही खर्च न करता करा ७ बदल - दिसाल अधिक तरुण- सुंदर
एक्सपायर क्रीम वापरण्यासाठी ५ 'मॅजिकल' ट्रिक
1. महागडे लेदर सोफे, बॅग्स, बेल्ट किंवा शूज काही काळानंतर खराब दिसू लागतात. अशावेळी एक्सपायर झालेली कोल्ड क्रीम किंवा मॉइश्चरायझर एका मऊ कापडावर घ्या आणि चामड्याच्या वस्तूंवर हलक्या हाताने घासून पुसून घ्या. यामुळे लेदरेला ओलावा मिळतो, त्यावरचे डाग कमी होतात आणि ते नव्यासारखे चमकू लागते.
2. लाकडी टेबल, खुर्च्या किंवा कपाटावर साचलेली धूळ आणि त्यांचा कमी झालेला ग्लो परत मिळवण्यासाठी एक्सपायर क्रीम उत्तम काम करते. क्रीममध्ये असलेले तेल लाकडाला पोषण देते. क्रीमने फर्निचरला मसाज केल्यास त्यावर एक संरक्षणात्मक थर तयार होतो, ज्यामुळे लाकूड खराब होत नाही आणि त्याला एक प्रकारची पॉलिश केल्यासारखी झळाळी मिळते.
3. आपल्या स्वयंपाकघरातील स्टीलचे नळ, बेसिन किंवा देवघरातील पितळ - तांब्याचे शोपीसवर अनेकदा पाण्याचे डाग राहतात. अशावेळी एक्सपायर झालेली क्रीम धातूंवर लावून थोडा वेळ ठेवा आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. क्रीमरमधील घटक धातुवरील ऑक्सिडेशन काढून टाकतात.
4. पावसाळ्यात किंवा सततच्या वापराने शूज खराब होतात. रबर आणि लेदरच्या चपलांना किंवा बूटांना स्वच्छ करण्यासाठी क्रीमरचा वापर करा. जर आपल्या चपलांमधून दुर्गंधी येत असेल, तर एक्सपायर क्रीममध्ये थोडा बेकिंग सोडा मिसळून त्याने चप्पल पुसल्यास दुर्गंधी दूर होते.
5. बऱ्याचदा दरवाजे खराब झाल्यामुळे उघडताना किंवा लावताना कर्कश आवाज येतो. जर आपल्याकडे वंगण तेल नसेल, तर दरवाज्यांच्या बिजागरींवर थोडी एक्सपायर्ड क्रीम लावा. क्रीममधील चिकटपणामुळे आवाज त्वरित बंद होतो आणि दरवाजा सहजपणे फिरू लागतो.
